Santosh Deshmukh, Sudarshan Ghule Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder : अखेर सुदर्शन घुले फुटला; जबाबात प्रतिक घुलेपासून सगळ्यांचे कारनामे सांगितले!

Sudarshan Ghule CID Confession : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याने सीआयडीला दिलेल्या जबाबात सरपंचांची हत्या कशी केली आणि कोणाच्या सांगण्यावरून केली याबाबतची धक्कादायक माहिती दिली आहे.

Jagdish Patil

Beed News, 02 Apr : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याने सीआयडीला दिलेल्या जबाबात सरपंचांची हत्या कशी केली आणि कोणाच्या सांगण्यावरून केली याबाबतची धक्कादायक माहिती दिली आहे.

वाल्मिक कराड, (Walmik Karad) विष्णू चाटे यांच्यानंतरचा सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी आहे. त्याने आपल्या जबाबात प्रतीक घुलेने संतोष देशमुखांच्या तोंडावर लघवी केल्याचं सांगितलं आहे. शिवाय लघवी केल्यानंतर त्यानेच देशमुखांच्या छातीवर उड्या मारल्याचंही सुदर्शन घुलेने सांगितलं.

तसंच यावेळी आपलं फोनवरून कुणाशी बोलणं झालं याबाबतचा खुलासा देखील त्याने जबाबात केला आहे. मागील वर्षी 9 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे यांनी मिळून संतोष देशमुखांच्या अपहरणाचा प्लॅन केला. यासाठी आंधळेने एक कार भाड्याने आणली. तर सुदर्शनने त्याची काळी जीप आणली होती.

सरपंच देशमुख आणि त्यांचा मावसभाऊ कारमधून एकत्र येत असल्याचं दिसताच या आरोपींनी त्यांच्या कारच्या मागे पुढे यांच्या गाड्या लावल्या. त्यानंतर दगडाने देशमुख यांच्या कारच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढलं. गॅसच्या पाईपने मारहाण केली आणि उमरी टोलनाक्यावरून त्यांचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांना टाकळी शिवारात नेऊन मारहाण केली यावेळीच देशमुख यांचा मृत्यू झाल्याचा घटनाक्रम जबाबातून समोर आला आहे.

मारहाण करताना कोणाला फोन केला?

तर सीआयडीला दिलेल्या जबाबत सुदर्शन घुलेने प्रतीक घुलेनेच संतोष देशमुखांच्या तोंडावर लघवी केल्याचं सांगितलं. शिवाय त्यानेच देशमुखांच्या छातीवर उडी मारल्यामुळे त्यांना रक्ताची उलटी झाली आणि मारहाण करताना दोन वेळा विष्णू चाटेशी फोनवरून बोलणं झाल्याचंही घुलेने कबूल केलं आहे.

खंडणीमुळेच हत्या

तर मारहाण केल्यानंतर देशमुख यांचा मृत्यू झाल्याचा संशय येताच त्यांना गाडीत बसवून आम्ही सगळे शेतात लपून अंधार पडण्याची वाट बघत होतो. अंधार पडल्यानंतर देशमुख यांचा मृतदेह दैठणा फाट्यावर टाकून दिला आणि सगळे वाशीच्या दिशेने गेलो, असंही घुलेने सांगितलं आहे. तर खंडणीमध्ये आडवं येणाऱ्याला आडवं करा असा निरोप वाल्मिक कराडने दिला होता. त्यामुळे आपण देशमुखांना मारहाण केल्याचंही घुलेने कबूल केलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT