Walmik karad sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टाचा मोठा दणका; 'ही' विनंती फेटाळली

Court Rejected Application of Valmik Karad: आपल्याला स्लीप अ‍ॅप्नीया नावाचा आजार असल्याचा दावा वाल्मिकीने अर्जात केला आहे. हा आजार असलेल्या रुग्णाला ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावले जाते. हे मशीन कोठडीत असताना आपल्याला मिळावी, अशी मागणी त्याने केली होती.

Mangesh Mahale

Walmik Karad: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण पेटलं आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या कोठडीत आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. कोठडीत असताना वाल्मिक कराडने न्यायालयाला विनंती केली होती. ही विनंती न्यायालयाने फेटाळली आहे.

केज सत्र न्यायालयात वाल्मिक कराडकडून उपचारबाबत विनंती अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली. आपल्याला स्लीप अ‍ॅप्नीया नावाचा आजार असल्याचा दावा वाल्मिकीने अर्जात केला आहे.

हा आजार असलेल्या रुग्णाला ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावले जाते. हे मशीन कोठडीत असताना आपल्याला मिळावी, अशी मागणी त्याने केली होती. तसेच हे मशीन लावण्यासाठी 24 तास एक मदतनीस हवा असल्याचंही वाल्मिकने आपल्या विनंती अर्जात म्हटलं होते. न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला आहे.

वाल्मिकी कराड हा 31 डिसेंबर रोजी पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण आला होता. सध्या तो बीड सीआयडीच्या कोठडीत आहे. संतोष देशमुख हत्येशी संबंधित थेट आरोपींच्या यादीत वाल्मिकी कराडचा समावेश नाही, पण याबाबतीत खंडणी मागण्याबरोबरच अन्य 15 गुन्ह्यांखाली त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे.

वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे.त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. वाल्मिक कराड यांनी पुण्यात येताना वापरलेली गाडी ही अजित पवार जेव्हा देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्या गाडीच्या ताफ्यात होती.

यावरुन खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांवर निशाणा साधला आहे. बजरंग सोनवणे यांनी आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी मध्यरात्री सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. या प्रकरणाबाबत काही खळबळजनक दावेही सोनवणे यांनी केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT