Minister Abdul Sattar News Sarkarnama
मराठवाडा

Minister Abdul Sattar : निवडणूक जवळ आली, हात जोडण्याची वेळ झाली..!

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political News : एकदा निवडून आलं की पाच वर्ष मतदारांकडे ढुंकून न पाहणारे पुढारी, निवडणुका जवळ आल्या की, मात्र पुन्हा हात जोडायला लागतात. राज्याच्या राजकारणात काही नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी असे आहेत, जे कायम मतदारांच्या संपर्कात असतात. (Minister Abdul Sattar) तर काहींना फक्त निवडणुका आल्या की त्यांची आठवण होते.

राज्याचे विद्यमान अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची मतदारसंघावर मजबुत पकड असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. सलग तीनवेळा सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. विशेष म्हणजे जिकडे सत्ता तिकडे सत्तार अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे.

त्यामुळे पंधरा वर्षाच्या राज्याच्या सत्तेत आधी काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये, त्यानंतर (Shivsena) शिवसेना- राष्ट्रवादी- काॅंग्रेसच्या महाविकास आघाडीत आणि आता शिंदे-फडणवीस सरकारमध्येही सत्तार मंत्री आहेत. (Marathwada) मंत्रीपदाच्या काळात त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. विविध योजना, प्रकल्प देखील ते राबवत आहेत.

हे करत असतांना कायम चर्चेत राहण्यासाठी प्रसंगी वाद ओढावून घेण्याची देखील त्यांची तयारी असते. यातूनच त्यांचे कृषीमंत्री पद महिनाभरापुर्वी गेले. सत्तार यांच्यासाठी पक्ष ही संकल्पनाच गौण आहे. त्यामुळे जिकडे सत्ता तिकडे सत्तार हे सुत्र ते सातत्याने राबवतांना दिसतात. काॅंग्रेस, शिवसेना आणि आता शिंदे गट या त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले तर ते लक्षात येते. पण शेवटी ज्या मतदारांच्या भरवशावर हे सगळं सुरू आहे, त्यांना विसरून कसे चालेल ? त्यामुळे आता वर्षभरावर आलेल्या विधानसभा निवडणुका पाहता सत्तार यांनी आता घरोघरी जाऊन मतदारांसमोर हात जोडणे सुरू केले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना व्हावा, या उद्देशाने `शासन आपल्या दारी`, ही योजना युद्धपातळीवर राबवली जात आहे. सत्तार यांनी मात्र आपल्या मतदारसंघात `हर घर दस्तक` हा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत त्यांनी आज सिल्लोड शहरातील गल्लीबोळात फिरून नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. सोबत नगर परीषद, जिल्हा परिषद, कृषी, महावितरण, आरोग्य, शिक्षण अशा सगळ्याच विभागांच्या अधिकाऱ्यांची फौज देखील होती. त्यामुळे एखाद्या कामाची तक्रार आली की जागेवर सत्तार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला फैलावर घेत होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT