Abdul Sattar-Mp Supriya Sule News, Aurangabad
Abdul Sattar-Mp Supriya Sule News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

सत्तारांचं घुमजाव, मी असं काही बोललोच नाही...

अनुराधा धावडे

औरंगाबाद :  राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची खासदार सुप्रिया सुळेंबाबत बोलताना जीभ घसरली. अत्यंत गलिच्छ भाषेत टीका केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या मुंबईतील शासकीय घरावरही हल्लाबोल केला. मात्र अब्दुल सत्तार यांनी माफी न मागता घुमजाव केलं आहे. मी महिलांबद्दल असं काही बोलले असं त्यांनी म्हटलं आहे.

सिल्लोडमध्ये बोलताना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही गलिच्छ भाषेत टीका केली. सुप्रिया सुळेंना तुम्ही खोके देण्याची ऑफर केली होती. त्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं, यावर काय सांगाल असा सवाल सत्तार यांना पत्रकाराने प्रश्न विचारला. या वर बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.

सत्तारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या घराच्या काचाही फोडल्या. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माफी मागून चालणार नाही तर, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, आणि रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराच चव्हाण यांनी दिला आहे.

इतकचं नव्हे तर, यानंतरही त्यांना त्यांच्या वक्तव्याचा कोणताही पश्चातापही झालेला दिसत नाही. त्यांच्या या टीकेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरहीर पुन्हा एकदा सत्तार यांनी "ते आम्हाला खोके बोलू लागले, आमचे खोके आणि त्यांचे डोके तपासावे लागेल, ज्यांचे डोके तपासावे लागेल खोक्याची आठवण येऊ लागली आहे त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो", अशा शब्दांत सत्तारांनी पुन्हा सुप्रिया सुळेंबाबत गलिच्छ भाषेत टीपण्णी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT