Savarkar Rally News Sarkarnama
मराठवाडा

Savarkar Rally News : `सावरकर गौरव` यात्रा, `वज्रमुठ` सभा म्हणजे निवडणुकीची तयारी ?

Chhatrapati Sambhajinagar : महाविकास आघाडी, शिंदे-भाजप युती आणि एमआयएम या सगळ्याच पक्षांना राजकीय लाभ उठवायचायं.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : उद्याचा दिवस छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या राजकारणातला एक महत्वाचा दिवस ठरणार आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) पहिलीच संयुक्त अशी `वज्रमुठ`, सभा आणि शिंदे-भाजपकडून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा उद्या (ता. २) होणार आहे. या सभा आणि गौरव यात्रा म्हणजे आगामी निवडणुकीची तयारीच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-भाजप युती एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीये. शिवाय (Bjp) भाजपने शिवसेना (Shivsena) फोडली तरी त्याचा राजकीय लाभ होण्याऐवजी तोटाच अधिक होत असल्याचे नुकत्याच झालेल्या काही निवडणुकांमधून दिसून आले आहे.

त्यामुळे ऐनकेन प्रकारे ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडीला मिळत असलेला प्रतिसाद कमी करण्याचा प्रयत्न शिंदे-भाजप युतीकडून केला जातोय. तर त्याला महाविकास आघाडीकडून देखील जशासतसे उत्तर देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी शहराच्या एका भागात दंगल उसळली असतांना लगेच `वज्रमुठ` आणि `सावरकर गौरव` यात्रेला परवानगी मिळाली कशी ? हा खरा प्रश्न आहे. परंतु सत्तेपुढे सर्वसामान्यांचे शहाणपण चालत नाही हेच खरे.

महाविकास आघाडीच्या सभेच्या दिवशीच सावरकर गौरव यात्रा काढण्याचा मुहूर्त निवडण्यात आला हा काही निव्वळ योगायोग नाही, तर तो राजकीय कुरघोडीचाच प्रकार आहे, हे आता लपून राहिलेले नाही. महाविकास आघाडी, शिंदे-भाजप युती आणि एमआयएम या सगळ्याच पक्षांना राजकीय लाभ उठवायचा असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर फक्त भाषण ठोकण्यातच नेते धन्यता मानत आहेत.

शहरातील पुर्व, पश्चिम आणि मध्य या तीन्ही मतदारसंघातून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. २ ते ८ एप्रिल अशा आठवडाभऱ्याचा हा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी ही यात्रा असल्याचे आयोजकांकडून सांगितले जाते. उद्या शहरातून सुरू होणारी यात्रा पुढे मराठवाडाभर काढण्यात येणआर असल्याचे यात्रा प्रमुख संजय केणेकर व संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT