Minister Amit Saha-Atul Save News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Save : अमित शहा तीन वर्षात जिल्हा बॅंका, सहकार क्षेत्राचे डिजिटलाइजेशन करणार..

संगणकीकरण आणि डिजिटलाइजेशन झाल्यानंतर शेतकरी, बॅंकेच्या सभासदाची माहिती देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकेल. ( Minister Atul Save)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : देशातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, केंद्र आणि राज्याच्या योजना आणि त्यांचा लाभ थेट त्याला मिळाला पाहिजे या पारदर्शक हेतून येत्या तीन वर्षात सहकार क्षेत्राचे पुर्णपणे डिजिटलाइजेशन करण्याचा मानस केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Saha) यांचा असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली. (Aurangabad) औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदानाचा लाभ घेतांना अंगठा देण्याची अट रद्द करा, (Atul Save) अशी मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत असल्याचा मुद्दा कार्यक्रमात उपस्थितीत करण्यात आला होता.

याचा संदर्भ देत अतुल सावे म्हणाले, केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना व्हावा, योजनेचे अनुदान किंवा रक्कम थेट त्याच्या खात्यात जमा व्हावी, त्यात कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, या चांगल्या हेतूने ही पद्धत अवलंबली जात आहे. यात शेतकऱ्यांवर अविश्वास व्यक्त करणे असा कुठलाही प्रकार नाही.

केवळ पारदर्शकता यावी या हेतूने शेतकऱ्यांचे थम घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. स्वस्त धान्य दुकानांमध्ये ही पद्धत लागू केल्यामुळे धान्य वितरणाच्या कामात ९५ टक्यापर्यंत पारदर्शकता आली आहे. लाभार्थ्यांपर्यंत धान्य व्यवस्थीत पोहचत आहे. त्यामुळे थम देण्यास विरोध करू नये, असे आवाहन सावे यांनी केले.

सहकार क्षेत्र हे शेतकऱ्यांशी निगडीत आहे. त्यामुळे येत्या तीन वर्षात जिल्हा, सहकारी बॅंका आणि एकूणच संपुर्ण सहकार क्षेत्राचे डिजिटलाइजेशन करण्याचा मानस केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचा आहे. संगणकीकरण आणि डिजिटलाइजेशन झाल्यानंतर शेतकरी, बॅंकेच्या सभासदाची माहिती देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकेल. याचा लाभ शेतकऱ्यांनाचा होणार असल्याचेही सावे म्हणाले.

कृषीमंत्री, रोहयो मंत्री आणि मी सहकार मंत्री आम्ही तिघेही शेती आणि शेतकऱ्यांशी निगडित खात्याचे मंत्री आहोत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, रखडलेल्या योजना व इतर मागण्यासंदर्भात सविस्तर निवदेन दिल्यास आम्ही ते सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन देखील सावे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT