Sayaji Shinde Beed Georai .jpg Sarkarnama
मराठवाडा

Beed Fire News: बीडमधील धक्कादायक घटना! अभिनेते सयाजी शिंदेंच्या देवराईला भीषण आग; पर्यावरणप्रेमींचा संताप,आग कुणी लावली?

Beed Sahyadri Devrai Fire: बीडमधील पालवण देवराईला अचानक आग लागल्यामुळे मोठी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक लागलेल्या या आगीत हजारो झाडांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

Deepak Kulkarni

Beed News: आगामी नाशिक येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळाव्यातील साधूग्रामसाठी तपोवनात हजारो वृक्षतोड करण्यात येणार होती. या वृक्षतोडीविरोधात मोठं आंदोलन छेडलं होतं. या आंदोलनात सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह अनेक कलाकार,मराठी कलाकार यांच्यासह पर्यावरणप्रेमी संस्था सहभागी झाल्या होत्या. पण न्यायालयानं या वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. पण आता याचदरम्यान, बीडमधून (Beed) एक हळहळवणारी व्यक्त करणारी बातमी समोर येत आहे.

अभिनेते सयाजी शिंदेंनी राज्यातील पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धनासाठी 'सह्याद्री देवराई' नावाची संस्था स्थापन केली आहे.या उपक्रमांतर्गत त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी देवराया उभारल्या आहेत. बीड जिल्ह्यातील पालवन या ठिकाणची देवराईचाही समावेश आहे.मात्र,बुधवारी (ता.24) अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईतील झाडांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

बीडमधील पालवण देवराईला अचानक आग लागल्यामुळे मोठी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक लागलेल्या या आगीत हजारो झाडांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. याचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात देवराईतील झाडांना आग लागलीच कशी? असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमी संस्थांकडूनही केला जात आहे.

महत्वाची बाब म्हणजे बीडच्या सह्याद्री देवराई येथे जगातील पहिले वृक्ष संमेलन संपन्न झालं आहे. सह्याद्री देवराईतील आगीच्या घटनेची माहिती राज्यभरात वाऱ्याच्या वेगानं पसरली आहे. यापूर्वीही आगीच्या घटनांचा मोठा फटका हा सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्या वृक्षसंवर्धनाच्या मोहिमेला बसल्याचं समोर आलेलं आहे.

बीड येथील पालवन येथील सह्याद्री देवराईला याआधी फेब्रुवारी 2022 रोजी भीषण आग लागली होती. या आगीच्या दुर्घटनेत जवळपास 2 ते 6 एकरमधील हजारो झाडे जळून खाक झाली होती. तसेच मार्च 2020 मध्ये पुण्याच्या कात्रज बोगद्याजवळ एका डोंगराला आग लागल्याचं दिसून येताच सयाजी शिंदे साताऱ्याकडे निघालेल्या सयाजी शिंदे यांनी आपली गाडी थांबवत झाडांच्या फांद्या आणि मातीच्या सहाय्याने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले,ज्यामुळे मोठी हानी टळल्याचं दिसून आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT