Minister Abdul Sattar-Cm Eknath Shinde News, Aurangabad
Minister Abdul Sattar-Cm Eknath Shinde News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

दिलेला शब्द पाळा म्हणत सत्तारांनी नंदनवन बंगला सोडला, अन् मंत्रीपद फिक्स झाले..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांचा शेवटच्या क्षणी समावेश करण्यात आला. शिरसाट की सत्तार? असा पेच निर्माण झाल्यानंतर मुख्यमत्री शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर यावरून चांगेलच महाभारत घडले. (Aurangabad) मंत्रीमंडळ विस्ताराच्या एकदिवस आधी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलांची नावे टीईटी घोटाळ्यात आली आणि त्यांच्या मंत्रीपदाच्या मार्गात अडथळे सुरू झाले.

ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या भुमरे-सत्तार यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय झाला होता. पण टीईटी घोटाळा आणि त्यात सत्तार यांच्या मुलांची नावं आल्यानंतर मंत्रीपदासाठी करण्यात आलेल्या फोनमध्ये बदल झाला. सत्तार यांच्याऐवजी (Sanjay Shirsat) शिरसाटांना फोन गेला आणि एकच खळबळ उडाली.

मंत्रीमंडळ विस्ताराच्या तोंडावर आपला समावेश होऊ नये यासाठीच टायमिंग साधत आपल्यावर बदनामी करणारे आरोप करण्यात आल्याचे सत्तारांनी सांगितले. चौकशी करा, कारवाई करा, दोषी नसेल तर आरोप करणाऱ्यांना फाशी द्या, अशी भाषा सत्तारांनी वापरली.

विरोधकांनी आपला बिसमिल्ला करण्यासाठी केलेली ही खेळी असल्याचे लक्षात आल्यानंतर सत्तार बचावात्मक पावित्रा घेतील, मंत्रीपदावरचा दावा सोडतील असा अंदाज वर्तवण्यात आला, पण घडले उलटेच, सत्तार अधिक आक्रमक झाले आणि आता तर मंत्रीपद मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार करतच त्यांनी शिंदेंचा बंगला गाठला.

मुख्यमंत्र्यांचा नंदनवन हा बंगला काल रात्री उशीरापर्यंत गर्दीने खचून भरलेला होता. ज्यांची नावे निश्चित झाली ते हळूहळू रवाना होत होते. घड्याळीत दहा, अकरा, बारा वाजले पण सत्तार की शिरसाट? याचा निर्णय होत नव्हता. दोघेही शिंदेंच्या बंगल्यात ठाण मांडून होते. यावेळी सत्तार-शिरसाट यांच्यात बाचाबाची, वादावादी झाल्याची देखील माहिती आहे.

शिंदे यांनी निर्णय सत्तार आणि शिरसाट यांच्यावर सोडला, दोघेही मागे हटायला तयार नव्हते. शेवटी सत्तार यांनी शिंदे यांना बंडाच्या वेळी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. तुम्ही मला कॅबिनेट मंत्रीपदाचा शब्द दिला होता, तो पाळा, असे म्हणत रात्री साडेबारा वाजता सत्तार यांनी नंदनवन बंगला सोडला आणि ते निघून गेले.

त्यानंतर शिंदे आणि शिरसाट यांच्यात रात्री उशीरापर्यंत चर्चा सुरू होती. अखेर अल्पसंख्याक चेहरा आणि दिलेला शब्द पाळावा लागेल असे सांगत शिंदेंनी शिरसाटांना पुढच्या विस्ताराच्यावेळी तुमचा विचार नक्की करने, असा शब्द दिला आणि सत्तारांचे मंत्रीपद फिक्स झाले. शपथविधीसाठी फोन आला नाही, पण आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या खुर्चीवरच थेट सत्तार दिसले. त्यामुळे सत्तार यांचा पुन्हा एकदा बिसमिल्ला होता होता राहिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT