Ranjeet Kasle On Walmik Karad News Sarkarnama
मराठवाडा

Beed News : बडतर्फ रणजीत कासलेच्या आरोपानंतर बीड कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी बक्सार मुलानी यांची तडकाफडकी बदली!

Buxar Mulani, a senior officer at Beed Jail, has been abruptly transferred following serious allegations made by dismissed police officer Ranjit Kasale. : कराडसाठी तुरुंगात विशेष चहा, चांगल्या प्रतीच्या चपात्यांची व्यवस्था केली जाते. तो स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कँटीनमधून दरमहा 25 हजाराची खरेदी करतो. कराडला चिकन, फरसाण दिले जाते.

Jagdish Pansare

Marathwada Political News : वाल्मीक कराड याला बीड कारागृहात व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. घरचे जेवण, चहा, पेपर चिकन अशी त्याची बडदास्त ठेवली जात आहे असा आरोप बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने केला होता. तसेच बीड कारागृहातून वाल्मीक कराडला नागपूर, पुण्याला हलवा, अशी मागणी सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करत केला होता. कासले याच्या आरोपानंतर बीड कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी बक्सार मुलानी यांची तडकाफडकी लातूर येथे बदली करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाच वर्षात तुला सोडवतो, असे आश्वासन देत त्याला बीड कारागृहातच ठेवून सगळी सोय ठेवण्याची व्यवस्था केल्याचा गंभीर आरोप रणजीत कासले याने केला. कराड याला बीड कारागृहातून न हलवण्यामागे त्याची बडदास्त ठेवता यावी हेच कारण असल्याचा दावा कासले याने काल सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करत केला होता.

कराडसाठी तुरुंगात विशेष चहा आणि चांगल्या प्रतीच्या चपात्यांची व्यवस्था केली जाते. (Beed News) इतकंच नव्हे, तर तो स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कँटीनमधून दरमहा तब्बल 25 हजार रुपयांची खरेदी करतो. कराडला चिकन, फरसाण दिले जाते, असा दावाही कासले याने केला केला. तसेच कराड याला नागपूर किंवा पुण्याच्या येरवडा तुरुगांत पाठवा, मग त्याला कळेल? असेही व्हिडिओमध्ये म्हटले होते.

सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. वाल्मिक कराडला मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपानंतर आता तडकाफडकी बीड कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी बक्सार मुलानी यांची लातूरला बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार असल्याची माहिती आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता.

जामीन मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत बीड कारागृहात वाल्मीक कराड याला कशी व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जाते याचे कथन केले होते. कराडला तुरुंगात स्पेशल चहा, जेवणात चांगल्या पोळ्या दिल्या जातात.कराड स्वत:सह इतर कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कँटीनमधून दर महिन्याला 25 हजार रुपयांची खरेदी करतो. त्याला पांघरण्यासाठी तीन तीन ब्लॅंकेट पुरवले जातात, ज्याचा वापर तो गादीसारखा करतो, असे गंभीर आरोप कासले याने केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT