औरंगाबाद : आषाढी एकदशी निमित्त काल शहरात राजेश सरकटे निर्मित 'गजर पंढरीचा' रौप्य महोत्सवी भक्तीमय कार्यक्रमाचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी एकत्रित आनंद घेतला. यावेळी भक्तीमय सरींमध्ये चिंब झालो.
या संगीत सुरांनी मंत्रमुग्ध केले. मी बऱ्याचदा या कार्यक्रमाचा आस्वाद यापूर्वी घेतला आहे. (Aurangabad) हा कार्यक्रम राज्याबाहेर दिल्लीसुद्धा व्हावा असे मनोमन वाटते, अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या.
सरकटे यांचे व्याही रावसाहेब दानवे आहेत. त्यामुळे ते अधिक सोपं होईल. आम्ही दोघं दिल्लीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन कसे उत्तम होईल याकडे लक्ष देऊ.दिल्लीमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिकांना तसेच इतरांना या भक्तीमय कार्यक्रमाचा आस्वाद कसा घेता येईल याकडे लक्ष देऊ.
दिल्लीत अशा सुंदर कार्यक्रमाचे नेहमीच औपचारिक किंवा अनौपचारिक आयोजन व्हावे, याची काळजी मी घेतली आहे. लता दिदींना भारतरत्न पुरस्कार मिळाला, त्यादिवशी संध्याकाळी माझ्या दिल्ली येथील निवासस्थानी लता दिदींच्या संगीताचा कार्यक्रम झाला होता.
मालिनीताई राजूरकर व भीमसेन जोशी यांनाही मी दिल्लीमध्ये ऐकले आहे. तीच परंपरा पुढे शक्य होईल तशी ती पुढे नेत राहू, असेही शरद पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.