Ncp News : राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी संपुर्ण राज्याचा दौरा करण्याचे जाहीर केले होते. (Sharad Pawar In Beed News) परंतु मध्यंतरीच्या राजकीय घडामोडी, विधीमंडळ अधिवेशना दरम्यान, अजित पवार व त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी घेतलेली भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा, देशपातळीवरील इंडिया या आघाडीची बांधणी या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा राज्य दौरा लांबणीवर पडला होता.
मात्र महाविकास आघाडीच्या राज्यातील बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी पक्षाची नव्याने उभारणी करण्यासाठी राज्याचा दौरा करण्याची घोषणा केली. अजित पवारांच्या बंडाला (Marathwada) मराठवाड्यातून मोठी साथ मिळाली होती. त्यामुळे येथील डॅमेज कंट्रोलची सुरुवात बीड जिल्ह्यापासून करण्यात येणार आहे. येवला येथील सभेनंतर शरद पवारांची बीडमध्ये सभा होणार आहे.
१७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या सभेच्या तयारीची जबाबदारी आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी व भाजपचे बहुतांश आमदार हे सत्तेत असतांना संदीप क्षीरसागर हे एकमेव शरद पवार यांच्यासोबत राहिले. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर संदीप क्षीरसागर यांनी `आपण सैदव साहेबांसोबतच`, असे जाहीर केले होते.
या एकनिष्ठतेचे फळ क्षीरसागर यांना शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद बहाल करून देण्यात आले होते. त्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील शरद पवार समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेत पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार बोलून दाखवला होता. शरद पवार हे स्वतः बीडमध्ये येत असल्याने त्यांच्या या निर्धाराला आता बळ मिळणार आहे. पवारांची बीडमध्ये सभा होणार असल्याने जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.