bajrang sonwane | sandeep kshirsagar sarkarnama
मराठवाडा

Bajrang Sonwane Vs Sandeep Kshirsagar : खासदार सोनवणे अन् आमदार संदीप क्षीरसागरांमध्ये धुसफूस?

Bajrang Sonwane Vs Sandeep Kshirsagar : अजित पवारांच्या दोन्ही बंडांच्या वेळी संदीप क्षीरसागर यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची साथ दिली. तर, बजरंग सोनवणे यांनीही भाजपच्या मातब्बर नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केलेला आहे.

Datta Deshmukh

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात धुसफुस सुरु झाली आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार आणि आमदार या दोघांनीही एकमेकांचे न पटणारे मुद्दे एकमेकांना ऐकविल्याची खात्रीशिर माहिती आहे.

काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून काका जयदत्त क्षीरसागर आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या संदीप क्षीरसागर यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला.

जयदत्त क्षीरसागर त्यावेळी शिवसेनेत गेल्याने शरद पवारांनी ( Sharad Pawar ) संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी आणि ताकदही दिली. त्यानंतर अजित पवारांनी केलेल्या बंडावेळी संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या बाजूने उभारले. त्यामुळे ते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेंच्या विश्‍वासू गोटात पोचले.

मागच्या वर्षीच्या बंडानंतरही संदीप क्षीरसागरांनी आपली भूमिका कायम ठेवली. जिल्ह्यातील सर्वच आमदार सत्तापक्षात असताना एकमेव संदीप क्षीरसागर विरोधी गटात होते. त्यामुळे त्यांना सत्तेच्या माध्यमातून सापत्नपणाही सहन करावा लागत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे ( Bajrang Sonwane ) यांनीही धाडस करत सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पंकजा मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवून त्यांनी विजयही मिळविला. मात्र, निकालानंतर या दोघांत धुसफूस सुरु झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.

अलीकडे सोनवणे बीड मतदारसंघातील बहुतांशी दौरे एकटे किंवा संदीप क्षीरसागर यांना विरोध करणाऱ्यांना सोबत घेऊन करतात. विरोधकांना सोनवणे मदत करत असल्याचा मुद्दा संदीप क्षीरसागर यांना खटकत असल्याची माहिती आहे. तर, ज्यांनी आपल्याला लोकसभा निवडणुकीत मदत केली त्यांना प्रतिसाद देणे, त्यांच्या बोलविण्यावरुन जाणे आपले काम असल्याचे सोनवणेंचे मत आहे. मात्र, यावरुनच दोघांमध्ये धुसफुस सुरु असल्याचे कळते. दोन दिवसांपूर्वी दोघांनीही शासकीय विश्रामगृहात एकमेकांना न पटणारे मुद्दे ऐकमेकांना ऐकविले. आता हे असेच चालत राहणार की त्यावर काही तोडगा निघणार हे पहावे लागेल.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT