amit shah sharad pawar sarkarnama
मराठवाडा

Video Sharad Pawar : 'भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार' म्हणणाऱ्या शहांचा पवारसाहेबांनी हिशेब चुकता केला; म्हणाले, तडीपार...

Sharad Pawar Vs Amit Shah : गृहमंत्री शाह यांच्या टीकेवर शरद पवारसाहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. पण, शुक्रवारी पवारसाहेबांनी अमित शाह यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

Akshay Sabale

'शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वांत जास्त भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचाराचे सरदार आहेत,' असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता. यानंतर गृहमंत्री शाह यांच्यावर चौफेर टीका करण्यात येत होती.

गृहमंत्री शाह ( Amit Shah ) यांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. पण, शुक्रवारी पवारसाहेबांनी अमित शाह यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

"मला भ्रष्टाचाऱ्याचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधून तडीपार केले होते," असं म्हणत पवारसाहेबांनी ( Sharad Pawar ) गृहमंत्री शाह यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. "तडीपार व्यक्ती देशाचे गृहमंत्री झाले आहेत. त्यामुळे आपला देश कुठल्या मार्गावर चालला आहे, याचा विचार करण्याची गरज आहे," अशी चिंताही पवारसाहेबांनी व्यक्त केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

शरद पवार म्हणाले, "देशातील भ्रष्टाचाऱ्यांचा सुभेदार मी आहे, असं अमित शाह यांनी म्हटलं. पण, गृहमंत्री गुजरातमध्ये असताना कायद्याचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना सर्वोच्च न्यायालयानं तिथून तडीपार केलं होतं. ज्यांना सर्वोच्च न्यायालयानं तडीपार केलं होतं. ते आज देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे आपला देश कुठल्या मार्गावर चालला आहे, याचा विचार करण्याची गरज आहे."

अमित शाह काय म्हणाले होते?

"शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वांत जास्त भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचाराचे सरदार आहेत. राज्यातील भ्रष्टाचाराला पवारांनी संस्थात्मक स्वरूप दिले. शरद पवार यांनी दहा वर्षांत काय केले, याचा हिशोब द्यावा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांना पुण्यातील कोणत्याही चौकात भाजपचा दहा वर्षांतील हिशोब देतील," असं म्हणत अमित शहांनी टीकास्त्र डागलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT