Sharad Pawar supporters News
Sharad Pawar supporters News Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar supporters News : शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा, म्हणून `तो` चक्क झाडावर जाऊन बसला..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तडकाफडकी राजकारणातून निवृत्त होण्याचा आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. (Sharad Pawar supporters News) त्यानंतर राज्यभरात त्यांचे समर्थक राजीनामे देत आहेत. काहीजण मुंबईत ठाण मांडून बसले आहेत, तर अनेकांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून त्यांना निर्णय मागे घेण्याची गळ घातली.

इकडे मराठवाड्यात त्यांच्या एक समर्थक चक्क चिंचेच्या झाडावर जाऊन बसला आहे. शुक्रवारी शरद पवार यांचा अंतिम निर्णय होईपर्यंत आपण इथेच बसून राहणार, असा निर्धार या समर्थकाने केला आहे. (Osmanabad) निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांनी मागे घ्यावा, यासाठी लोहारा तालुक्यातील आरणी येथील सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी बळवंत थिटे हे चिंचेच्या झाडावर बसून आहेत.

सेवानिवृतीनंतर शेती करत असलेले थिटे हे शरद पवारांचे कट्टर समर्थक आहेत. शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत, यासाठी सन १९९३ ते २०१४ या काळात आपली दाढी वाढवून अनोखा प्रण देखील थिटे यांनी केला होता. (Marathwada) विशेष म्हणजे थिटे हे काही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते नाहीत. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा आहे.

त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शरद पवार यांना आपला पाठिंबा असल्याचे ते सांगतात. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा घेतलेली निर्णय त्यांना रूचला नाही. पवार यांनी आपली निवृत्ती मागे घ्यावी, यासाठी थिटे यांनी गुरुवारी (ता. चार) दुपारी बारा वाजता आपल्या शेतातील चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह सुरू केला.

ग्रामस्थांनी बळवंत थिटे यांना झाडावरून खाली उतरण्याची विनंती केली. परंतु ते आपल्या भूमिकेवर ठाम असून सत्याग्रह सुरूच ठेवणार आहेत. शरद पवार यांनी इतरांना विश्वासात न घेता तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. ही बाब आमच्यासारख्या समर्थकांना वेदना देणारी आहे. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाच्या निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी, यासाठी झाडावर बसून सत्याग्रह करीत आहे. उद्या शुक्रवारी (ता. पाच) होणाऱ्या राष्ट्रवादी काँगेसच्या बैठकीत कोणता निर्णय होतोय ते पाहून झाडावरुन खाली उतरण्याचा निर्णय घेणार असल्याचे थिटे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT