Phulambri Market Committee, News
Phulambri Market Committee, News Sarkarnama
मराठवाडा

Phulambri Market Committee : शिंदे गटातील फूट बागडेंना डोकेदुखी ? महाविकास आघाडीची वज्रमुठ तयार..

नवनाथ इधाटे

Marathwada : फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Phulambri Market Committee) निवडणुकीत युती, आघाडीचे काय होते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न झाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले. मात्र भाजप-शिंदे गटाची युती झाली असली तरी शिंदे गटात फूट पडली आहे. माजी सभापती किशोर बलांडे यांचा गट भाजप सोबत गेला आहे, तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांचा गट स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.

या फुटीमुळे (Bjp) भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट यांनी सर्वमान्य तोडगा काढत पॅनल तयार केले आहे. या बाजार समितीत माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे, (Haribhau Bagde) माजी आमदार डॉ.कल्याण काळे, माजी सभापती किशोर बलांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे या प्रमुख नेत्यांनी आपापली शक्ती पणाला लावली आहे.

शिवसेना शिंदे गट व भाजप हे राज्यातले समीकरण फुलंब्री येथील बाजार समितीच्या निवडणुकीतही होईल अशी अपेक्षा होती. परंतु शिवसेना शिंदे गटात फूट पडली असून जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांचा गट भाजपला जाऊन मिळाला आहे. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांचा गट स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधली आहे.

एकूण १८ जागांसाठी भाजपने शिवसेना शिंदे गटाचे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या गटाला तीन जागा दिल्याची चर्चा आहे. तर उर्वरित जागेवर भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी व्यापारी मतदारसंघात दोन, हमाल मापारी मतदारसघात एक तर सोसायटी मतदारसंघात एक असे स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटात मोठी फूट पडली असल्याचे दिसते. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गट या तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे एकमत झाल्याने महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT