Shinde-Fadnavis Givernment Sarkarnama
मराठवाडा

Shinde-Fadnavis Givernment : शिंदे-फडणवीस सरकारविरोधात अशोक चव्हाण आक्रमक ; 'या' आयुधाचा वापर करणार

सरकारनामा ब्यूरो

Congress News : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात येत्या पावसाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आगामी काळात आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहेत. (Shinde-Fadnavis will bring violation of rights against the government : Ashok Chavan)

महाविकास आघाडी (Mahavikas Aaghdi) सरकारच्या काळात कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला हेाता. तसेच, नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनभर अनुदान देण्याचे जाहीर केले होते. पण काही शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत, असेही चव्हाण (Ashok Chavan) यांनी सांगितले.

आमदार चव्हाण म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील जवळपास २५ ते ३० कोटी रुपये अजून मिळालेले नाहीत. कुंडल सेवा सहकारी सोसायटीसंदर्भात सभागृहात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.

सहकारी मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा झाली. मात्र, त्यांनी आश्वासन देऊनसुद्धा कुंडल सेवा सोसायटीबाबतची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सरकारने याबाबत निर्णय घेतला तर हक्कभंग आणण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. मात्र, या सरकारने स्वतःच दिलेल्या आश्वसनाची पूर्तता न केल्यास आमच्याकडे जे काही आयुध उपलब्ध आहे. त्याबाबत सभागृहात त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील जनतेला केवळ आश्वासने देत आहे. त्याची अमलबजावणी होताना दिसत नाही. गेली वर्षभर नुसत्या घोषणा केल्या जात असून जाहिरातबाजीवर करोडो रुपये खर्च केले जात आहेत, त्यामुळे सरकार आपलीच आश्वासने पाळत नाही, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

चांद्यापासून बांद्यापर्यंत राज्यात कुणाचाही धाक राहिलेला नाही. गोरगरीबांना, सर्वसामान्यांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. शिवाय मूळ प्रश्नांना बगल देऊन दुसरेच विषय पुढे केले जात आहेत, त्यामुळे सरकारचे महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. मराठा आरक्षणाचा विषयही हे सरकार काढत नाही. मंत्रिमंडळाचा विस्तारही यांना करता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारचे कान टोचले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT