Manoj Jarange Patil, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : जरांगे-पाटील राजकीय वक्तव्य करणार नाहीत; मात्र शिंदे सरकारसमोर ठेवली 'ही' अट

Manoj Jarange Patil On Shinde Govt : "सगेसोयऱ्याची अधिसूचना सरकार काढते, पण त्याची अंमलबजावणी का होत नाही?" असा सवाल जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Akshay Sabale

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून आंतरवाली-सराटी येथे उपोषणाला सुरूवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन जरांगे-पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे. राज्यभरातून मराठा आंदोलनस्थळी एकटवला आहे. जरांगे-पाटील हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत.

सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी, हैदराबाद, सातारा आणि आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकांवरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गन्हे मागे घ्यावे, या मागणीसाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून सोमवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.

एकीकडे जरांगे-पाटील उपोषणाच्या माध्यमातून शिंदे सरकारला घाम फोडणार आहेत. दुसरीकडे सरकारनं मागण्या पूर्ण केल्यास राजकीय वक्तव्य करणार नसल्याचं जरांगे-पाटलांनी स्पष्ट केलं आहे. "आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा, मी राजकीय वक्तव्य करणार नाही. मात्र, नंतर माझ्या नावाने बोंबलायचं नाही," असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला आहे.

"मी दिसावं म्हणून कधीच आंदोलन करत नाही. मी माझ्या स्वत:च्या क्षमतेवर आंदोलन करतो. दुसऱ्याच्या जिवावर आम्ही आंदोलन करत नाहीत. आम्ही कोणाची वाट पाहत नाही. आम्ही लढतोय. अल्टिमेटम वगैरे काही नाही. देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी आहे," असं जरांगे-पाटलांनी ठणकावून सांगितलं.

"सगेसोयऱ्याची अधिसूचना सरकार काढते, पण त्याची अंमलबजावणी का होत नाही? किती दिवस गोरगरीबांना फसवणार आहात? हैदराबाद गॅझेट तिथून आणायचं आहे. मात्र, सातारा आणि बॉम्बे गॅझेट तर सरकारकडे आहे. तरी अंमलबजावणी का केली जात नाही? एवढा अन्याय का?" असा सवाल जरांगे-पाटलांनी शिंदे सरकारला विचारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT