Cm Eknath Shinde-Beed Shivsena Chief Sachin Muluk News Sarkarnama
मराठवाडा

Beed : ठाकरेंनी काढून घेतलेले मुळूकांचे जिल्हाप्रमुख पद शिंदेनी पुन्हा बहाल केले..

सचिन मुळूक यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ४७ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत शिंदे गटात प्रवेश केला. (Beed News)

सरकारनामा ब्युरो

बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी राजकीय भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या बाजूने जिल्ह्यात सर्वप्रथम शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी उघड भूमिका घेतली. (Marathwada) शिवसेनेच्या तत्कालिन संपर्कप्रमुखांचे व्यक्तीगत इंटरेस्ट आणि वाळूसह इतर व्यवसायांत भागीदारीचा थेट आरोप मुळूक यांनी केला होता. (Beed) त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांना आता शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचे गिफ्ट मिळाले आहे.

मागील २० वर्षांपासून शाखाप्रमुख ते शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम केलेल्या सचिन मुळूक यांचे मागच्या वर्षी पद काढण्यात आले. दरम्यान, आता (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी नवी राजकीय भूमिका घेतल्यानंतर सचिन मुळूक यांनी पत्रकार परिषद घेऊन या भूमिकेचे स्वागत केले. तसेच, शिवसेनेचे तत्कालिन जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्यावर वाळू ठेक्यात भागीदारीचे गंभीर आरोप जाहीर पत्रकार परिषदेतून केले होते.

तसेच, वडिलांच्या निधनाच्या दु:खात आणि घरातील सर्व सदस्य कोविडग्रस्त असताना जिल्हा प्रमुखपद काढल्याची खंतही व्यक्त केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुळूक यांना शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचे गिफ्ट मिळाले आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी सचिन मुळूक यांना नियुक्तीपत्र दिले.

दरम्यान, सचिन मुळूक यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ४७ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये महिला आघाडीच्या चंद्रकला बांगर, अलका डावकर, अंबाजोगाई तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, योगेश नवले, गुंडीबा नवले, बाळासाहेब कुरुंद, अजय दाभाडे, अनंत चिंचाळकर, अजित शिनगारे, आदींचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT