Shivsena News: ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मातोश्रीवर येवून रडले होते. आघाडीसोबतची युती तोडा आणि भाजपसोबत चला नाही तर ते मला जेलमध्ये टाकतील, असा दावा ठाकरे यांनी एका मुलाखती दरम्यान केला. याचे राजकीय पडसाद आता उमटायला सुरूवात झाली आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलतांना (Mahavikas Aghadi) काॅंग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी तोडा हे सांगण्यासाठी एकनाथ शिंदे मातोश्रीवर गेले होते, आम्ही सगळ्या आमदारांनी त्यांना आम्हाला आघाडीसोबत राहायचे नाही हे सांगितले होते, तो निरोप घेवून ते गेले होते. रडले वगैरे ही आदित्य ठाकरे (Aditya Thakceray) यांनी दिलेली माहिती चुकीची आहे, ती त्यांच्या बोलण्याची स्टाईल असल्याचे शिरसाट म्हणाले.
महाविकास आघाडी सोबत सत्तेत असतांना शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती, त्यांना निधी दिला जात नव्हता. (Sanjay Shirsat) त्याबद्दल सगळ्याच आमदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. आम्ही उद्धवसाहेबांना भेटून हे सांगण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. मग आम्ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना तुम्ही गटनेते आहात, तुम्ही आमदारांची नाराजी वाढत आहे, कुणालाच महाविकास आघाडीत राहण्याची इच्छा नाही हे उद्धव साहेबांना सांगितलं पाहिजे हे आम्ही त्यांना सांगायचो.
त्यानूसार शिंदेसाहेब उद्धव ठाकरेंना भेटले. एकदा नाही तर अनेकदा त्यांनी आमदारांची नाराजी त्यांच्या कानावर घातली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत रहायचे नाही, ही सगळ्याच आमदारांची इच्छा होती. संजय राऊत यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या शिंदे रडले होते या विधानाला दुजोरा दिला याकडे लक्ष वेधले असता संजय राऊत यांच्या विधानावर आपण बोलणार नसल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.