Shirdi Temple News, Aurangabad
Shirdi Temple News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shirdi Temple : शिर्डी साईबाबा मंदिराला मिळणार उच्च दर्जाची सुरक्षा..

सरकारनामा ब्युरो

High Court : साईबाबा मंदिर व परिसर, शिर्डी यांची सुरक्षा, केंद्रीय पोलिस राखीव दल, किंवा केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दल यांच्या मार्फत देण्यासंदर्भात प्रधान जिल्हा न्यायाधिश तथा अध्यक्ष यांनी अहवाल सादर केला होता. Shirdi या अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर व्ही घुगे व न्या. एस. ए देशमुख यांनी दिले.

कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (High Court) ॲड. सतीश तळेकर यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. (Shirdi) सदर जनहित याचिकेत असे नमूद आहे की, विविध पोलिस अधिकारी व साईबाबा संस्थानचे विश्वस्त यांनी वेळोवेळी मंदिर सुरक्षा केंद्रीय पोलिस राखीव दल किंवा केंद्रीय औद्योकीय सुरक्षा दलामार्फत देण्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केला आहे.

मात्र आतापर्यत कोणतीही कार्यवाही झाली नाही. शिर्डी येथे गुन्हेगारीचे प्रमाण दररोज वाढत आहे. त्याचप्रमाणे साईभक्तांची सुरक्षा वाढवण्याचीही गरज आहे. त्या अनुषंगाने प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी महाराष्ट्र सुरक्षा दल व गरज पडल्यास राज्य पोलिस राखीव दलाची सुरक्षा मंदिर परिसरास मिळाल्यास येथील सुरक्षा व्यवस्था मजबूत होईल, असा अहवाल सादर केला होता.

प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष यांच्या अहवालानुसार कार्यवाही करावी, तसेच त्याचा प्रगती अहवाल खंडपीठात ५ जानेवारी पर्यत सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे काम पाहत आहे. तर शासनातर्फे ॲड ज्ञानेश्वर काळे, संस्थानतर्फे ॲड संजय मुंढे काम पाहत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT