औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने ते कमालीचे नाराज आहेत. मंत्री होण्याची इच्छा होती, पण सगळ्यांनाच एकावेळी खूष करता येत नाही, मला पुढच्या विस्तारात संधी मिळेल, अशी स्वतःची समजूत घालून (Sanjay Shirsat) शिरसाट सध्या मतदारसंघात फिरत आहेत.
एका विकासकार्यक्रमात बोलतांना राजकारणात सिनिअरिटीच राहीली नाही, माझ्या मागून येवून अतुल सावे (Atul Save) आधी राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्री झाल्याची खंत शिरसाट यांनी व्यक्त केली. शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळात संजय शिरसाट यांचे नाव ऐनवेळी कापले गेले. (Aurangabad) महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली.
त्याचबरोबर भाजपचे पुर्वचे आमदार अतुल सावे यांना कॅबिनेट पदी बढती आणि सहाकर सारखे महत्वाचे खाते देखील मिळाले. तर मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या संजय शिरसाट यांना मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सबुरीचा सल्ला दिला. आता नव्या विस्तारात संधी मिळेल या अपेक्षेवर शिरसाट पुन्हा मतदासंघात सक्रीय झाले आहेत.
एका कार्यक्रमात बोलतांना शिरसाट म्हणाले, आताच मंत्री झालेले अतुल सावे यांचे वडिल मोरेश्वर सावे यांच्यासोबत मी काम केले आहे. तेव्हा कधी वाटलेही नव्हते की अतुल सावे राजकारणात येतील. पण ते राजकारणात आले, आधी राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्रीही झाले.
आनंद आहे, अरे पण जरा आमच्याकडेही बघा, असा टोला देखील शिरसाटांनी लगावला. राजकारणात आता काही सिनिअरिटी वगैरे राहिलीच नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.