Dnyaneshwar Pati sarkarnama
मराठवाडा

Dnyaneshwar Patil : माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन

Roshan More

Dnyaneshwar Patil News : भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन झाले. फुफ्फुस इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांचे पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी (ता.2) रात्री साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजता परंडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सामान्य शिवसैनिक ते आमदार असा ज्ञानेश्वर पाटील यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. 1995 आणि 1999 अशा दोन वेळेस ते भूम परंडा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर ही ज्ञानेश्वर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर राहण्याचा निर्णय घेतला. कट्टर शिवसैनिक म्हणून ज्ञानेश्वर पाटील परिचित होते.

चीप चालक ते आमदार

ज्ञानेश्वर पाटील यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. प्रवास वाहतूक करणाऱ्या जीपवर ते चालक म्हणून काम करत होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते शिवसेनेत कार्यरत झाले. संघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. नगरसेवक म्हणून देखील ते निवडून आले होते. 1995 आणि 1999 मध्ये सलग दोन वेळा ते आमदार झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT