Kailas Gorantyal, Arjun Khotkar
Kailas Gorantyal, Arjun Khotkar sarkarnama
मराठवाडा

शिवसेनेचे माजीमंत्री - काँग्रेस आमदारामध्ये जुंपली ; समर्थकांमध्ये दगडफेक

सरकारनामा ब्यूरो

जालना : पानशेंद्रा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) हे आमने सामने आले. त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. (Arjun Khotkar latest news)

यावेळी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. १३ जागासाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दोन्ही गटात बाचाबाची झाली आहे.

आक्रमक खोतकर गटाकडून दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार सामितीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी या निवडणुकीत दोन्ही गटांत चुरस निर्माण झाली आहे.

अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर आणि आमदार काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात सरळ लढत होत आहे. खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आमने सामने आल्याने समर्थकही एकमेकांमध्ये भिडले.

पानशेंद्रा निवडणुकीच्या राड्यानंतर अर्जुन खोतकर म्हणाले, "मतदान शांततेने सुरू आहे. मतदार निश्चितपणे आम्हाला कौल देतील. आत्ता ते पराभूत होणार असल्याने विरोधक असे बोलत आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT