Shivsena Leader Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे थेट मणीपूरमध्ये प्रचाराला

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता देशभरात पसरत असल्याचा दावा करत शिवसेनेने या चारही राज्यांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. (Shivsena Maharashtra)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : इकडे जिल्ह्यात शिवसेनेचा मोठा नेता कोण? यावरून वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी जिल्ह्यात मीच मोठा नेता, मग बाकीचे सगळे असे म्हणत, पक्षांतर्गत विरोधकांना ठणकावले. (Shivsena) आता याच मोठ्या नेत्यावर शिवसेना नेतृत्वाने मोठी जबाबदारी टाकली आहे. (Manipur) खैरे यांना थेट मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पाठवण्यात आले आहे.

काही पदाधिकारी, शिवसैनिकांना घेवून खैरे आज इंफाळ विमानतळावर उतरले. पुढील पाच दिवस ते विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. मणिपूर राज्यात विधानसभेच्या ६० जागा असून शिवसेना इथे मोजक्या पाच जांगावर नशीब आजमवात आहे.

इंफाळ विमानतळावर खैरे व इतर पदाधिकाऱ्यांचे स्थानिक शिवसैनिकांनी स्वागत केले. दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या डेलकर विजयी झाल्या आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला शिवसेना हा पक्ष पहिल्यांदा राज्याबाहेर विजय मिळवण्यात यशस्वी झाला. महाराष्ट्रात भाजपशी फारकत घेऊन काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवा घरोबा केल्यापासून भाजपला आडंव जाण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही.

यापुर्वी शिवसेनेने उत्तर प्रदेशसह अन्य राज्यात उमेदवार उभे केले, पण ते फक्त नावालाच. यावेळी मात्र महाराष्ट्रातील आघाडी सरकार आणि विशेषतः शिवसेनेला राज्य व केंद्रातील भाजप नेतृत्वाकडून ज्या प्रकारे त्रास दिला जातोय, तो पाहता शिवसेनेने देखील भाजपला अंगावर घेण्याची भूमिका घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने यूपी, पंजाब, गोव्यानंतर मणिपूरमध्येही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

या चारही राज्यांमध्ये शिवसेनेने एक आकडी का होईना पण उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी युवासेनेचे अध्यक्ष तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेते मैदानात उतरले आहेत. मणिपूर राज्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता देशभरात पसरत असल्याचा दावा करत शिवसेनेने या चारही राज्यांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना हा पक्ष राष्ट्रीय पक्ष बनवण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल असल्याचे बोलले जाते. रविवारी इंफाळ विमानतळावर शिवसेना मनीपुरच्यावतीने खैरेंसह इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

या राज्यात निवडणुकीचा पहिला टप्पा २७ फेब्रुवारी तर दुसराटप्पा ३ मार्च रोजी होणार आहे. मतमोजणी १० मार्चला होणार आहे. चंद्रकांत खैरे १३ फेब्रुवारीपासून १६ फेब्रुवारीपर्यंत मणिपूरची राजधानी इंफाळ येथे विविध ठिकाणी प्रचार सभा, कॉर्नर बैठका आणि सहयोगी संघटना यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT