Yogesh Kadam 3 Sarkarnama
मराठवाडा

Yogesh Kadam mobile missing : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना 'बीड'चा झटका; मोबाईल 'मिसिंग' की?

Shiv Sena Minister Yogesh Kadam mobile phone Beed Police Inspector Vaibhav Patil missing device : शिवसेना मंत्री योगेश कदम काल बीड दौऱ्यावर असताना त्यांचा मोबाईल मिसिंग झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिली.

Pradeep Pendhare

Beed district news : बीड जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारी महाराष्ट्रात चर्चेत आहे. रोज नव नव्या घटना उघडकीस येत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीवरून सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील आक्रमक आहेत. सामाजिक कार्यकर्ते रोजच चिंता व्यक्त करतात.

शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम काल बीड आणि जालना दौऱ्यावर होते. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मंत्री कदम बीडनंतर पुढे जालना दौऱ्यावर गेले. याच दरम्यान, मंत्री कदम यांचा मोबाईल मिसिंग झाला. केज पोलिस ठाण्यात यासंदर्भात मिसिंग दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिली.

गृहराज्यमंत्री योगेश कदम काल बीडच्या (BEED) दौऱ्यावरती होते. मस्साजोग मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन पर भेट घेतली. तिथं सुरू असलेल्या घराच्या कामाची पाहणी केली. मंत्री कदम यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेत चर्चा केली. बीडमधील कार्यक्रम आटपल्यानंतर मंत्री कदम जालना इथं गेले.

याच दरम्यान, मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांचा मोबाईल मिसिंग झाला. या सर्व काळात मंत्री कदम बहुतांशवेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर होते. असे असतानाच, मंत्री कदम यांचा मोबाईल मिसिंग झाल्याने त्याच वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. मोबाईल 'मिसिंग' झाला की अन् कोणी हातचलाखी दाखवली, यावर आता चर्चा रंगल्या आहेत. मंत्री कदम यांच्या मोबाईल गहाळप्रकरणी केज पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी ही माहिती दिली.

बीड पोलिसांच्या कारभारावर नाराजीच...

बीड जिल्ह्यातील दौऱ्यात मंत्री कदम यांनी पोलिसांच्या ढिसाळ कारभारावर ताशोरे ओढले. आता मंत्री कदम यांचाच मोबाईल बीडमध्ये 'मिसिंग' झालाय. आरोपींना मदत होईल, असे कृत्य केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना मदत केली जोईल. कोणालाही सोडणार नाही. काहींना निलंबन केलेले आहे. या कारवाईनंतर देखील पश्चाताप झालेल्या नसलेल्या अधिकाऱ्याना बडतर्फ करण्याचा इशारा मंत्री कदम यांनी दिला होता.

आरोपींच्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर ताशोरे

संतोष देशमुख यांच्या हत्येतील वाँटेड कृष्णा आंधळेला पकडण्याचे शंभर टक्के प्रयत्न सुरू आहे. त्याला आज ना उद्या पोलिस पकडतील, असा विश्वास व्यक्त केलाय. तसेच, वाल्मिक कराड आणि महादेव गीतेचे जेलमध्ये टोळीयुद्ध भडकल्यावरून मंत्री कदम यांनी मुख्य आरोपींना बीड जेलमधून स्थलांतरित केले जाणार आहे. जेल प्रशासन आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असतील, तर चौकशी होईल, असेही मंत्री कदम यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT