Eknath Shinde-Sushma Andhare News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : भाजपसोबत जाऊन काहीच मिळाले नाही, मग कशासाठी केला अट्टाहास..

शिवसेनेपासून वेगळे होण्याची वेगवेगळी कारणे शिंदे गटातील आमदार देत आहेत. त्यात हिंदूत्व, निधी न मिळणे, महाराष्ट्राची अस्मिता जपणे, शिवसेना वाचविणे आदी कारणांचा समावेश आहे. (Shivsena)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एकनाथ शिंदे हे नावालाच मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे पोझिशन आहे, पण पॉवर मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. सगळी मलिद्याची खाती Bjp भाजपकडे आहे, असा आरोप Shivsena शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी (ता. २० )पत्रकार परिषदेत केला.

माझे सर्व ४० भाऊ उपाशी आहेत, त्यांना केवळ त्यांची सत्ता आल्याचा भ्रम झालाय, असा टोलाही अंधारे यांनी लगावला. (Eknath Shinde) पक्षाच्यावतीने महाप्रबोधन यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त सुभाष अंधारे औरंगाबादेत (Shivsena) आलेल्या आहेत. त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

अंधारे म्हणाल्या, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु आतापर्यंत या सरकारने जनतेसाठी कोणतेही ठोस काम केलेले नाही. उथळ आणि तात्कालिक मुद्यांवर हे सरकार बोलत आहे. राज्यात बेरोजगार, महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्या यासारखे अनेक प्रश्न आहेत. पण कोणत्याच विषयावर हे सरकार गंभीर नाही. मुख्यमंत्री शिंदे हे नावापुरतेच मुख्यमंत्री आहेत.

कारण वित्त, गृह यासह सर्व महत्वाची खाती फडणवीस आणि भाजपकडे आहेत. महाप्रबोधन यात्रेतून आम्ही काही प्रश्न विचारत आहोत. त्याचीही योग्य उत्तरे मिळत नाही, असेही अंधारे यांनी सांगितले. शिवसेनेपासून वेगळे होण्याची वेगवेगळी कारणे शिंदे गटातील आमदार देत आहेत. त्यात हिंदूत्व, निधी न मिळणे, महाराष्ट्राची अस्मिता जपणे, शिवसेना वाचविणे आदी कारणांचा समावेश आहे.

परंतु ही सगळी कारण तकलादू आहेत. मुद्दा सत्तेचा होता, पण आताही भाजपसोबत जाऊन यांना काय मिळाले तर काहीच नाही. मग कशासाठी केला होता अट्टाहास असे त्यांना विचारावेसे वाटते असेही अंधारे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT