MLA Santosh Bangar & Ayodhya Paul
MLA Santosh Bangar & Ayodhya Paul  Sarkarnama
मराठवाडा

एकदा नाही तर लाख वेळा गद्दार म्हणेन, बांगरांमध्ये हिंमत असेल तर...

सरकारनामा ब्यूरो

Santosh Bangar : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आले आहेत. ते शिंदे गटात गेल्याने शिवसेनेकडून (Shivsena) त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर ते कमालीचे आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत.

दरम्यान, शिंदे गटात गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणण्याऱ्यांच्या कानशिलात मारा, असा सल्लाच बांगर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र, त्यांचे हे आवाहन शिवसेना सोशल मिडियाच्या समन्वयक अयोध्या पौळ (Ayodhya Paul) यांनी स्विकारले असून एकदा नाही लाख वेळा गद्दार म्हणेन हिंमत असेल तर बांगरांनी आपल्याला मारून दाखवावे, असे आव्हान दिले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आता बांगर काय प्रतिक्रिया देतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. (Ayodhya Paul & MLA Santosh Bangar Latest Marathi News)

पौळ म्हणाल्या की, शिवसैनिक तोच आहे जो ठाकरे आणि 'मातोश्री'सोबत आहे. ज्या लोकांनी मातोश्रीला धोका दिला ते माझ्यासाठी गद्दारच आहेत. त्यामुळे मी एकदा नाही तर लाख वेळा त्यांना गद्दार म्हणणार आहे. बांगर यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्या कानाखाली त्यांनी मारावी. त्यांच्या समर्थकांना मला फोन करायला सांगण्यापेक्षा, मला फोन करुन त्यांनी धमकी द्यावी, असेही आव्हान त्यांनी बांगरांना केलं आहे.

ठाकरे अन् 'मातोश्री' सोडून जे गेलेत ते गद्दारच आहेत. मी त्यांना गद्दारच म्हणणार असून एकदा नाही तर लाख वेळा गद्दार म्हणते. शिवसैनिक तोच आहे जो ठाकरे आणि 'मातोश्री'सोबत आहे. ज्या लोकांनी 'मातोश्री'ला धोका दिला ते माझ्यासाठी गद्दारच आहे. बांगरांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मला मारून दाखवावं आपल्या बगलबच्च्यांना मला फोन करुन धमकी द्यायला लावू नये. करुन-करुन ते काय करतील..हात पायच मोडतील ना? माझे आई-वडील म्हणतील लेकीने शिवसेनेसाठी जीव दिला. तसे झाले तर माझ्यासारखी दुसरी भाग्यवान कोण नसेल. त्यांच्या धमक्यांना मी घाबरणारी नाही. मी बाळासाहेब ठाकरेंची निष्ठावान आहे, असे पौळ यांनी बांगरांना ठणकावले.

दरम्यान,शिंदे यांनी बंड केल्यावर ठाकरेंसाठी अश्रू ढाळणारे बांगरांनी शिंदे गटात जाण्यासाठी २४ तासांत पलटी मारली होती. बांगरांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतांना (त्यांच्या भाषेत बंड केलेल्या) बंडखोरी केलेल्या आमदारांना कोण गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढा, अशी चिथावणी कार्यकर्त्यांना देत आपण मरेपर्यंत शिवसैनिक राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आपल्याला कोण का रे करत असेल तर त्यांच्या कानाखाली जाळ काढा, असे बांगर म्हणाले होते. त्यांच्या याच आव्हानाला पौळांनी प्रतिआव्हान दिल आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला असून त्यांच्या आव्हानाला बांगर काय उत्तर देतात हे बघणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT