Ex.Minister Shivraj Patil Chakurkar News, Osmanabad
Ex.Minister Shivraj Patil Chakurkar News, Osmanabad Sarkarnama
मराठवाडा

Shivraj Patil Chakurkar News : युवकांची शक्तीच कॉंग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देईल..

अविनाश काळे

Congress : कॉंग्रेस पक्षाने देशाची लोकशाही, संविधानाला विशेष स्थान देऊन सामाजिक एकता जपली आहे. आर्थिक आणि सामाजिक समानतेसाठीही प्रयत्न झाले आहेत, यात आणखी सुधारणा अपेक्षित आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातुन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विविध ज्वलंत प्रश्नांला घेऊन देशाच्या अखंडतेसाठी केलेले प्रयत्न प्रेरणा देणारे असून युवकांनी जबाबदारीने काम करून काँग्रेस पक्षाला उभारी द्यावी, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.

महाराष्ट्र युवक काँग्रेस समिती व उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हा युवक काँग्रेसच्या (Youth Congress) वतीने मंगळवारी (ता. सात) उमरगा येथे `माझा गाव माझी शाखा`, अंतर्गत युवक कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी चाकुरकर बोलत विरोधक काहीही म्हणत असले तरी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कॉंग्रेस पक्षाचे योगदान कुणीही नाकारत नाही. १४० कोटी लोकसंख्येचा देश अन्नधान्याच्या बाबतीत सक्षम करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या.

आधुनिक तंत्रज्ञान, राष्ट्रीय एकात्मतेचे बिजारोपन काँग्रेसच्या काळात झाले. राहुल गांधी यांच्या विचारधारेचा प्रभाव समाज मान्य होत असून येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा प्रभाव नक्कीच दिसून येईल, असा दावा देखील चाकूरकरांनी केला. तर अदानीच्या आर्थिक घोटाळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार पाठीशी घालत आहे. गुजरातेतील चौघांच्या इशाऱ्यावर सुरू असलेली हुकमशाही संपली पाहिजे.

एकाधिकारशाही, महागाई आणि भाजप असे समीकरण झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातुन लोकांमध्ये भाजपाचा खरा चेहरा उघड करुन सर्वांच्या मनात घर केले आहे. कार्यकर्त्यांनी संघटन कौशल्याच्या बळावर एक परिवार म्हणुन काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचे बिजारोपन शेवटच्या टप्प्यापर्यंत केले पाहिजे, असे आवाहन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी केले.

शिबीरास माजी मंत्री बसवराज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, प्रा. मोतीपवळे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, प्रभारी मितेंद्रसिंग, सह प्रभारी प्रदिप सिंघव, संघटनप्रभारी कोकोजी (छत्तीसगढ), प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष कुणाल राऊत, शिबीराचे प्रमुख संयोजक तथा युवक काँग्रेसचे प्रदेशचे उपाध्यक्ष शरण पाटील आदींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT