jyoti mete | manoj jarange patil sarkarnama
मराठवाडा

Jyoti Mete : मेटेंचे आरक्षणासाठीच बलिदान, डॉ. ज्योती मेटेंच्या उमेदवारीला पाठींबा द्या; समर्थकांचे जरांगेंना साकडे

Manoj Jarange Patil : मागच्या दोन दिवसांत मनोज जरांगे-पाटील यांनी बीड जिल्ह्यातील केज, परळी, बीड, आष्टी, गेवराई व माजलगाव मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.

Datta Deshmukh

दिवंगत लोकनेते, विनायकराव मेटे यांनी आपली तहहयात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काम केले. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी जातानाच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. आता त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या उमेदवारीला पाठींबा द्यावा, अशी गळ मेटे समर्थकांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना घातली.

सध्या मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patol ) आंतरवाली-सराटी (जि. जालना) येथे राज्यभरातील विधानसभा मतदारसंघांचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस, भाजप, दोन्ही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा पवार ) अशा सर्वच पक्षांतील नेत्यांची आंतरवाली-सराटीला रिघ लागली आहे.

मागच्या दोन दिवसांत बीड जिल्ह्यातील केज, परळी, बीड, आष्टी, गेवराई व माजलगाव मतदारसंघांचा आढावा झाला. बीड मतदारसंघाच्या आढाव्यावेळी शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाच्या वतीने मनोज जरांगे-पाटील यांना बीडमधून डॉ. ज्योती मेटे यांच्या उमेदवारीला पाठींबा द्यावा, असे साकडे घातले.

दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या आरक्षण चळवळीचा आणि आरबी समुद्रातील शिवस्मारक उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांचा यावेळी उहापोह करुन आता त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना पाठींबा देण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, जिल्हाध्यक्ष नारायण काशीद, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सनदी लेखापाल बी. बी. जाधव, सामाजिक कार्यकर्ते गवते, बीड विधानसभा प्रमुख प्रा. सुभाष जाधव, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, आष्टीचे ज्ञानेश्वर चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंडित माने, सचिन काळकुटे, मजूर फेडरेशनचे संचालक बाळासाहेब हावळे, मुकुंद गोरे, गणेश धोंडरे, श्रीराम घोलप, शैलेश सुरवसे, सुहास मेटे, अनिल मोरे, विजय डोके आदींचे शिष्टमंडळ यावेळी मनोज जरांगे-पाटील यांना भेटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT