Aditya Thackeray-Abdul Sattar News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : कृषी मंत्र्यांना लाज नाही, ते राजकीय कार्यक्रम अन् दुसऱ्याची मजा उडवण्यात व्यस्त..

याआधीही मी ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी राज्यात फिरत होतो. पण लाज नसलेल्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांशी काही देणघेणचं नाही. (Aditya Thackeray)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री कोण आहेत? हेच शेतकऱ्यांना माहित नाही, कारण ते कुठेही बांधावर जातांना दिसत नाहीत. मी अनेकदा त्यांचा राजीनामा मागितला पण त्यांना लाज नाही, ते राजकीय कार्यक्रम घेण्यात आणि दुसऱ्यांची मजा उडवण्यातच व्यस्त आहेत, असा घणघाती आरोप युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

अकोला येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. शिवसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा होत असल्याचे विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, कुणाला राजकीय कार्यक्रम घ्यायचे असतील त्यांनी ते खुशाल घ्यावे. मी मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवास साधणार आहे. याआधीही मी ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी राज्यात फिरत होतो. पण लाज नसलेल्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांशी काही देणघेणचं नाही.

राज्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्री कोण आहेत हेच माहित नाही. कारण ते कुठेच दिसत नाहीत, शेतकऱ्यांचे हाल होत असतांना ते राजकीय कार्यक्रम घेण्यात आणि इतरांची मजा उडवण्यात व्यस्त आहे. राज्यातील कृषी आणि उद्योग या दोन्ही खात्यांची वाट लागली आहे.

उद्योग क्षेत्रात एकही मोठा प्रकल्प उद्योगमंत्र्यांना आणता आलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांवर ते बांधावर जात नाही अशी टीका करतात, याकडे लक्ष वेधले असता घटनाबाह्य मुख्यमंत्री ज्यांच्या शेतात दोन हेलिपॅड आहेत ते असं म्हणू शकतात, असा टोला देखील ठाकरे यांनी शिंदे यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT