Shivsena-Sambhaji Brigade Alliance News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : युती झाली, आता एकदिलाने काम करू ; खैरेंची ब्रिगेडच्या नेत्यांना साद..

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संभाजी ब्रिगेडशी झालेली युती निश्चितच राज्याच्या राजकारणाला वळण देणारी ठरेल. (Chandrakant Khaire)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीची राज्यभरात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांनी या नव्या युती आणि समीकरणावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर ही युती म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी म्हणत (Shivsena) शिवसेनेला टोला लगावला. मात्र याकडे दुर्लक्ष करत राज्यातील शिवसेना व संभाजी ब्रिगेडचे नेते, पदाधिकारी मात्र तयारीला लागल्याचे चित्र आहे.

मराठा आरक्षणासह सामाजिक प्रश्नात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी युती करत शिवसेनेने नवी खेळी केली आहे. (Marathwada) आता ती किती यशस्वी होते, हे येणारा काळच ठरवणार आहे. दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी काल सदिच्छा भेट घेतली. या भेटीत दोन्ही बाजूंनी या युतीचे स्वागत करतांनाच भविष्यात जिल्ह्यात व मराठवाड्यात कशी वाटचाल करायची यावर चर्चा झाली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता, खैरे यांनी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र काम करू, असा विश्वास दिला. शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर विरोधकांसह अन्य राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले असले तरी सेना-ब्रिगेडच्या नेत्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरूवात केली आहे. संभाजी ब्रिगेडचा प्रभाव मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आहे.

औरंगाबाद शहर व जिल्ह्यात ब्रिगेडची बांधणी बऱ्यापैकी आहे. विशेषतः मराठा आरक्षणाच्या आंदोलनात संभाजी ब्रिगेडने महत्वाची भूमिका वठवलेली आहे. शिवसेने सोबतच्या युतीमुळे संभाजी ब्रिगेडला देखील बळ मिळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील यशापयशावरच या नव्या युतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे यांच्यासह मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्हीकडील नेत्यांनी एकमेकांना लाडू भरवत नव्या युतीचे स्वागत केले. शिवसेना ही तळागाळातील कार्यकर्त्यांची संघटना आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संभाजी ब्रिगेडशी झालेली युती निश्चितच राज्याच्या राजकारणाला वळण देणारी ठरेल. यापुढे आपण दोघे मिळून एकदिलाने काम करू, अशी ग्वाही देखील चंद्रकांत खैरे यांनी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT