जालना : "कायमच आयुष्यभर शिवसेनेतच राहणार,"असा दावा शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केला होता. त्यानंतर ते शिंदे गटात जाणार अशा बातम्या गेले काही दिवस माध्यमात येत होत्या. या चर्चांना आज अखेर पूर्णविराम मिळाला. (Arjun Khotkar latest news)
"मी सच्चा शिवसैनिक आहे. मी एकनाथ शिंदेंना समर्थन करीत आहे. शिंदे गटात जाण्याचा मी निर्णय घेतला आहे," असे खोतकर यांनी जाहीर केलं. 'परिस्थितीनुसार मी हा निर्णय घेत आहे,' असे ते म्हणाले. शिंदे गटात जाण्याबाबत मी उद्धव ठाकरेंकडे परवानगी मागितली होती, असे खोतकर म्हणाले. आज (शनिवारी) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले.
शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर (arjun khotkar)हे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून होते. काल सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार हे अर्जुन खोतकर यांना शिंदे गटात सामावून घेण्यासाठी मध्यस्ती करीत असल्याची चर्चा होती. खोतकरांची मनधरणी करण्यासाठी सत्तारांनी काल दिल्ली गाठली होती. हे दोघे नेते ही काल दिल्लीहून परतले होते.
काही दिवसापूर्वी अर्जुन खोतकर-एकनाथ शिंदे यांची दिल्लीत गुप्त भेट झाल्याचाही एक व्हिडिओ समोर आला होता. अर्जुन खोतकर हे काल (शुक्रवारी) थेट दिल्लीवरून जालना शहरात असलेल्या त्यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. अर्जुन खोतकर आपल्या दर्शना बंगल्यासमोर येताच कार्यकर्त्यांकडून फटाके उडविण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार आतिषबाजी करीत खोतकरांच स्वागत केलं.
खोतकर यांनी काल निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधला.कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेतला. खोतकर समर्थकाकाकडून एकनाथ शिंदे यांच्या सिल्लोड दौऱ्याच्या स्वागताच्या बॅनर वर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार, यांच्या बरोबर अर्जुन खोतकर यांचा फोटो लावला आहे.
शिंदे गटात जाण्याबाबत काल खोतकर म्हणाले होते की "माझा निर्णय अजून माझ्याशिवाय कुणालाही माहित नाही, शिंदे गटात जायचं की उद्धव ठाकरेंसोबत राहायचं याचा निर्णय उद्या जाहीर करणार आहे. आज जर निर्णय जाहीर केला तर काही लोकांना रात्रभर झोप लागणार नाही"
पक्षनेतृत्वाचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की, त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आणि ती जबाबदारी मी समर्थपणे सांभाळू शकलो.
मी १९९० मध्ये शिवसेनेच्यावतीने पहिल्यांदा आमदार झालो आणि आजपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे, पक्षाची सेवा करत आलो आहे.
मी एकटाच नाही तर आमचे सर्व सहकारी आणि सगळ्यांनी मिळून जिल्ह्यात शिवसेनचं संघटन वाढवलं आणि ते सामान्य माणासापर्यंत आम्ही ते घेऊन गेलो.
सामान्य माणसाने देखील तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला. अनेक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आमच्या पदरात लोकांनी यश टाकलं त्याबद्दल मी जालना जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.