CM Eknath Shinde News, Arjun Khotkar News, Uddhav Thackeray Latest News
CM Eknath Shinde News, Arjun Khotkar News, Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
मराठवाडा

Arjun Khotkar : आज निर्णय जाहीर केला तर काही लोकांना रात्रभर झोप लागणार नाही !

सरकारनामा ब्युरो

जालना : शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर (arjun khotkar)हे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून होते. आज सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार हे अर्जुन खोतकर यांना शिंदे गटात सामावून घेण्यासाठी मध्यस्ती करीत असल्याचे समजते.खोतकरांची मनधरणी करण्यासाठी सत्तारांनी आज दिल्ली गाठली होती. हे दोघे नेते ही नुकतेच दिल्लीहून परतले आहेत.

अर्जुन खोतकर यांनी कायमच आयुष्यभर शिवसेनेतच राहण्याचा दावा केला आहे. पण, आता खोतकर शिंदे गटाच्या वाटेवर जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अर्जुन खोतकर-एकनाथ शिंदे यांची दिल्लीत गुप्त भेट झाल्याचाही एक व्हिडिओ समोर आला होता.

गेल्या चार दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याच्या चर्चेनंतर अर्जुन खोतकर हे आज थेट दिल्लीवरून जालना शहरात असलेल्या त्यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. अर्जुन खोतकर जालण्यात दाखल होण्यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली होती. यावेळी अर्जुन खोतकर आपल्या दर्शना बंगल्यासमोर येताच कार्यकर्त्यांकडून फटाके उडविण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार आतिषबाजी करीत खोतकरांच स्वागत केलं.

खोतकर सध्या आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्याच बरोबर कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करीत आहेत. खोतकर हे उद्या (शनिवारी) आपला निर्णय जाहीर करणार आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील खोतकर समर्थकाकाकडून एकनाथ शिंदे यांच्या सिल्लोड दौऱ्याच्या स्वागताच्या बॅनर वर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार, यांच्या बरोबर अर्जुन खोतकर यांचा फोटो लावत असल्याने खोतकर यांचा शिंदे गटातील प्रवेश हा निश्चित झाला असल्याचं बोलले जाते.

याबाबत खोतकर म्हणाले, "माझा निर्णय अजून माझ्याशिवाय कुणालाही माहित नाही, शिंदे गटात जायचं की उद्धव ठाकरेंसोबत राहायचं याचा निर्णय उद्या जाहीर करणार आहे. आज जर निर्णय जाहीर केला तर काही लोकांना रात्रभर झोप लागणार नाही"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT