Dr. Bhagwat Karad-Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : औरंगाबादकरांना पाणी न मिळण्याचे पाप भाजपचेच...

आज केंद्रात राज्य मंत्री असलेले डाॅ. भागवत कराड यांना स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सांगण्यावरून नगरसेवक, महापौर मी केले. आज तेच म्हणतात खैरेंना काय कळते. (Chandrakant Khaire)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : आज पाणी प्रश्नावर बोंबा मारणारे, मोर्चाची तयारी करणारे भाजपचे लोकच औरंगाबादकरांना पाणी न मिळण्यास जबाबदार आहेत. समांतर जलवाहिनीला विरोध केल्यामुळेच आज नागरिकांना आठ दिवसाआड पाणी मिळते, हे पाप भाजपचेच (Bjp) असून शिवसेनेला श्रेय मिळेल यामुळेच त्यांनी समांतर योजना घालवली, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला.

मुंबईत झालेल्या हिंदी भाषी महासंकल्प सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खैरे यांचे नाव घेऊन संभाजीनगरच्या मुद्यावरून टीका केली होती. (Shivsena) तर दुसरीकडे औरंगाबाद शहरातील नागरिकांना पाण्यासाठी झगडावे लागण्यास शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. (Aurangabad) या सगळ्या आरोप आणि टीकेला चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.

औरंगाबादकरांचे पाण्यावाचून आज जे हाल होतायेत त्याचे पाप भाजपचेच असल्याचा आरोप खैरेंनी केला. खैरे म्हणाले, समांतर जलवाहिनी झाली असती तर आज नागरिकांना दररोज पाणी मिळाले असते. ही योजना मंजुर करून आणण्यासाठी मी खासदार असतांना खूप प्रयत्न केले. ही योजना मंजुर करून आणली पण नंतर त्यामध्ये सातत्याने खोडा घालण्याचे काम भाजपच्या लोकांनी केले. एक सनदी अधिकारी देखील यात सामील होता.

महापालिकेवर पुन्हा भगवाच..

तेव्हा समांतरला विरोध करणारेच आज पाणी प्रश्नावरून आम्हाला जाब विचारत आहेत, मोर्चा काढण्याची नाटंक करत आहेत. नागरिकांना नियमित पाणी मिळावे म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने १६८० कोटींची पाणी योजना दिली आहे. तिचे काम देखील सुरू आहे, लवकरच पाण्याचा प्रश्न निकाली लागेल आणि पुन्हा एकदा महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा दावा देखील खैरे यांनी केला.

डाॅ. कराड यांच्या आरोपांना देखील खैरे यांनी उत्तर दिले. आज केंद्रात राज्य मंत्री असलेले डाॅ. भागवत कराड यांना स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सांगण्यावरून नगरसेवक, महापौर मी केले. आज तेच म्हणतात खैरेंना काय कळते. तुम्ही आज मंत्री झालात, केंद्रात राज्य मंत्र्याला किती अधिकार असतात हे मी जवळून पाहिलेले आहे, तेव्हा त्यांनी जास्त फुशारक्या मारू नये, असा टोला देखील खैरे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT