Shivsena Leader Chandrakant Khaire On Dasra Melawa News
Shivsena Leader Chandrakant Khaire On Dasra Melawa News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार ; दुसरा पर्याय मान्यच नाही..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एक नेता, एक मैदान ही शिवतीर्थावरील मेळाव्याची मोठी परंपरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेली आहे. (Shivsena) मराठी माणूस आणि हिंदुत्वाची भूमिका घेत त्यांनी राज्यात आणि देशातील जनतेला दिशा दाखवली. मी स्वतः १९७१ पासून दसरा मेळाव्याला येतो आणि आधी बाळासाहेबांचे आणि आता उद्धव ठाकरेंचे विचार ऐकतो. या ईडी सरकारने कितीही काड्या केल्या तरी दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, अन्य पर्याय आम्हाला मान्यच नाही, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आक्रमक भूमिका मांडली.

दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी शिवसेनेने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. दोन दिवसांत यावर निर्णय होईल, परवानगी मिळाली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा देखील खैरे यांनी दिला. (Maharashtra) शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या न्यायलीयन कोठडीत १४ दिवसांची वाढ झाली. या दरम्यान, कोर्टाच्या आवारात चंद्रकांत खैरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली.

यावेळी दोघांमध्ये चर्चा देखील झाली. त्यानंतर शिवसेना शिवतीर्थावरच मेळावा घेण्यासाठी अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. या संदर्भात चंद्रकांत खैरे यांच्याशी संपर्क साधला असता, राऊत यांची भेट व चर्चा झाल्याचे खैरे यांनी सांगितले. कित्येक वर्षापासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होतो. पण एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यानंतर झालेले सत्तांतर यामुळे सरकारने हे मैदान शिवसेनेला मिळू नये यासाठी गलिच्छ राजकारण सुरू केले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक परंपरा आहे. मराठी व हिंदू माणूस या मेळाव्यातून विचारांचे सोने विजया दशमीच्या दिवशी लूटत असतो. बाळासाहेबांनी घालून दिलेली त्यांची ही परंपरा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे चालवत आहे. पण ही परंपरा खंडीत करण्याचा प्रयत्न हे ईडी सरकार करत आहे. पण शिवसैनिक या सरकारला घाबरणार नाही.

मुंबई महापालिकेकडे शिवसेनेने परवानगी मागितली आहे, येत्या दोन दिवसांत यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यानंतर आम्ही कोर्टात जाणार आहोत. दसरा मेळावा रोखण्याचा व मैदान मिळू नये यासाठी काड्या करणाऱ्या या सरकारने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी ते स्वतःच जबाबदार असतील, असा इशारा देखील खैरे यांनी दिला. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, यापुढेही असणार आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांना याची चांगली जाणीव आहे ते झक मारून परवानगी देतील, असा दावा देखील खैरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT