Abdul Sattar-Aditya Thackeray News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : आधी आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, मग मी देतो ; सत्तारांनी दिले आव्हान..

हिंदुंची संख्या जास्त असून देखील केवळ मी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतो, प्रत्येकाचा योग्य सन्मान करतो, म्हणून ते लोक मला लाखोंच्या मतांनी निवडून देतात. (Mla Abdul Sattar)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : आम्ही शिंदेसोबत गेल्यानंतर आमच्यावर टीका केली गेली. आम्हाला गद्दार, बंडखोर, बाळासाहेबांचा फोटो वापरू नका, तुमच्या वडिलांच्या नावाने मत मागा, अशी टीका केली गेली. हिमंत असेल तर राजीनामा देवून पुन्हा निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिले होते. मी त्यांचे आव्हान स्वीकारले होते, पण २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे फोटो वापरून मतं मागितली होती. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी आधी त्यांच्या वरळी मतदारसंघातून राजीनामा द्यावा, मग मी देखील सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा देतो, अस खुले आव्हान आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिले.

सिल्लोड येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार आणि विविध विकासकामांचे उद्घाटन, भुमीपूजन कार्यक्रमात सत्तार बोलत होते. अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत केले. (Shivsena) हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला लोकांनी हजेरी लावली होती. यावेळी सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळतांनाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले.

अब्दुल सत्तार म्हणाले, ज्या फायली दोन-अडीच वर्ष सहीविना पडून होत्या, त्या फायलींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा दिवसांत सह्या करत कोट्यावधींचा निधी दिला. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामांना आता गती येणार आहे. रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांसाठी सुतगिरणी, अजिंठ्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक, भीमपार्क अशा सगळ्यांच कामांना आता गती मिळाली आहे. भविष्यात देखील आपली कुठलीच फाईल मुख्यमंत्री अडवणार नाहीत, असा चिमटाही सत्तार यांनी यावेळी काढला.

रावसाहेब दानवे, अर्जून खोतकर यांचा उल्लेख करत आता आम्ही तिघं एकत्रं असल्यामुळे मराठवाड्याचा विकास करू. दानवे यांनी माझा बिस्मिल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो झाला नाही. आता आपल्याला दानवे यांच्याकडून रेल्वे मंजुर करून घ्यायची आहे, नाही केली तर मग दीड वर्षांनी पुन्हा निवडणूक आहेच, असा टोलाही सत्तार यांनी लगावला.

गेल्या २५ वर्षापासून मी या मतदारसंघातून निवडून येतो. हिंदुंची संख्या जास्त असून देखील केवळ मी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतो, प्रत्येकाचा योग्य सन्मान करतो, म्हणून ते लोक मला लाखोंच्या मतांनी निवडून देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला इतका निधी दिला की, ते पाहून आता इतर आमदार देखील त्यांच्या मागे लागतील असेही सत्तार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT