मराठवाडा

Shivsena : गोळीबार, तंगड्या तोडण्याची भाषा करणाऱ्यांना आमदारांना सरकारचे सरंक्षण...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे बिघडलेली आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार दिवसाढवळ्या बंदूक काढून गोळीबार करतात, एक आमदार विरोधकांच्या तंगड्या तोडा असे सांगतो, कुणी चून चून के मारेंगेची भाषा करतो आणि अशा चिथावणीखोर आमदारांना सरकार संरक्षण देते. सरकारच कायदा हातात घेणार असले तर सामान्यांनी दाद कुणाकडे मागायची? असा सवाल करत (Shivsena) शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Shingh Kohyari) यांची भेट घेतली.

दानवे यांनी विदर्भ आणि राज्याच्या विविध भागांचा नुकताच दौरा केला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाला भेटी देत त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे सांत्वन देखील केले.(Maharashtra) त्यानंतर आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून सत्ताधारी पक्षाचे आमदार दिवसाढवळ्या धमक्या देत आहेत, गोळीबार करत आहेत आणि तरी देखील त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही, असा आरोप दानवे यांनी केला. सत्ताधारी पक्षाचे आमदार सदा सरवणकर, सुर्वे, संजय गायकवाड, संतोष बांगर हे विरोधकांना धमकावत आहेत, शासकीय अधिकाऱ्यांवर हात उचलत आहेत.

अमरावतीच्या खासदार पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घातलात, अधिकाऱ्यांना धमकावतात. राज्य सरकार मात्र अशा लोकप्रतिनिंधीवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत आहे. राज्य सरकारच कायदा हातात घेणार असले तर मग सामान्यांनी कोणाकडे दाद मागायची असा सवाल देखील दानवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, अतिवृष्टीच्या मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, शिवसेना गटनेते व आमदार अजय चौधरी, सुनील प्रभू, अनिल परब, रवींद्र वायकर, संजय पोतनीस, सुनील राऊत, प्रकाश फातर्पेकर, रमेश कोरगावकर, विलास पोतनीस, मनीषा कायंदे, सचिन अहिर यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT