Imtiaz Jalil-Chandrakant Khaire News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : इम्तियाज जलील खोटारडे, देसाईंकडून निधी घेतला आणि त्यांच्यावरच उलटले..

Chandrakant Khaire : इम्तियाज यांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही, असा कुठलाही घोटाळा झालेला नाही

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political News : हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची प्रकरणं गाजत असतांनाच इम्तियाज जलील यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर लॅंड कन्व्हर्जनच्या माध्यमातून कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. यावर (Shivsena) शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करतांना इम्तियाज जलील हे खोटारडे असल्याची टीका केली.

ज्या सुभाष देसाईंनी पालकमंत्री असतांना इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांना ३ कोटींचा निधी दिला, त्याच देसाईंवर ते उलटले, असे म्हणत देसाई हे अत्यंत शांत स्वभावाचे होते, त्यांनी कधीही चुकीचे काम केलेले नाही. या संदर्भात देसाई यांनी नागपूरात खुलासा देखील केला आहे, ते इम्तियाज यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत, असेही खैरे (Chandrakant Khaire) यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितले.

खैरे म्हणाले, इम्तियाज जलील हे विकासकामांवर कधीच बोलत नाहीत. फक्त खोटे आणि बेछूट आरोप करत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. आतापर्यंत त्यांनी केलेले किता आरोप सिद्ध झाले हे देखील बघितले पाहिजे. राहिला प्रश्न सुभाष देसाई यांचा तर ते पालकमंत्री असतांना कधीही कामा व्यतिरिक्त कुणाला जास्त बोलत नव्हते. फक्त जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून ते जिल्ह्याते प्रश्न मार्गी लावायचे.

शांत स्वभावाचे देसाई कधीही चुकीचे काम करणार नाहीत, याचा मला विश्वास आहे. इम्तियाज जलील यांनी आरोप केले आहेत, तर आता ते सिद्ध करून दाखवावेत. उलट पालकमंत्री असतांना इम्तियाज जलील यांना त्यांनी डीपीडीसीमधून भरघोस निधी दिला.

माझ्यापेक्षा जास्त जवळपास ३ कोटी रुपये निधी देसाई यांनी त्यांना दिला, आता तेच त्यांच्यावर उलटले. इम्तियाज यांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही, असा कुठलाही घोटाळा झालेला नाही, असा दावा देखील खैरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT