Dipali Sayyad-Chandrakant Khaire News, Aurangabad Sarkarama
मराठवाडा

Shivsena : अंधारेंना चिल्लर म्हणणाऱ्या दिपाली सय्यद यांना खैरे म्हणाले `लिप्स्टीकवाली बाई` ..

सुषमा अंधारे आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे या शिवसेनेच्या प्रभावी नेत्या आहेत. त्या लिप्स्टीकवाल्या बाईला हे काय कळणार. (Channdrakant Khaire)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या औरंगाबादेतील महाप्रबोधन यात्रेत टीका करतांना नेत्यांची जीभ घसरत असल्याचे समोर आले आहे. Shivsena विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या संदर्भात शिवराळ भाषा वापरल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire यांची देखील शिंदे गटाच्या दिपाली सय्यद यांच्यावर टीका करतांना जीभ घसरली.

पावडर लावणारी, लिप्स्टीकवाली बाई, असा उल्लेख करत (Chandrakant Khaire) खैरेंनी त्यांच्यावर टीका केली. शिवसेनेत असतांना दिपाली सय्यद या आपल्या परखड भूमिका आणि आक्रमकपणासाठी ओळखल्या जायच्या. शिंदेंच्या बंडानंतर त्यांनी अनेकदा फुटून गेलेल्या आमदारांवर टीका देखील केली होती. परंतु सुषमा अंधारे यांचा (Shivsena) शिवसेनेत प्रवेश आणि उपनेते पदी निवड झाल्यापासून दिपाली सय्यद यांचे पक्षातील महत्व कमी झाले होते.

या नाराजीतूनच दिपाली सय्यद यांनी काही दिवसांपुर्वी रश्मी ठाकरे, सुषमा अंधारे, निलम गोऱ्हे यांच्यावर टीका करत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. रश्मी ठाकरे यांना महापालिकेतून मिळणारे खोके बंद झाल्याचे दुःख आहे, तर सुषमा अंधारे, निलम गोऱ्हे या चिल्लर असल्याची टीका दिपाली यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केली होती.

याचाच उल्लेख खैरे यांनी कालच्या आपल्या भाषणात केला. सुषमा अंधारे आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे या शिवसेनेच्या प्रभावी नेत्या आहेत. त्या लिप्स्टीकवाल्या बाईला हे काय कळणार. पावडर लावून आमच्याकडे आली होती, म्हणे मी नेता, ती कसली नेता.

आता तिकडे शिंदे गटात जाणार म्हणून आमच्यावर टीका करतेय. पण अजून त्या बाईला तिकडेही प्रवेश दिलेला नाही. प्रवेश झाला की त्यांना घेऊन फिरतील, अशा शब्दात खैरे यांनी दिपाली सय्यद यांच्यावर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT