Chadrakant Khaire-J. Nadda News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : नड्डा येऊ द्या, नाहीतर मोदी ; औरंगाबादचा खासदार उद्धव ठाकरे ठरवतील तोच..

Chandrakant Khaire : भाजपने कितीही शक्ती लावली तरी खरे हिंदुत्ववादी कोण? ढोंगी कोण? हे जनतेला माहित आहे.

सरकारनामा ब्युरो

Chandrakant khaire : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची लोकसभेच्या तयारीसाठी शहरात जाहीर सभा होणार आहे. पण नड्डा येऊ द्या, नाहीतर मोदी या जिल्ह्याचा खासदार उद्धव ठाकरे ठरवतील तोच होणार, असा दावा (Shivsena) शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत काही लोकांच्या गद्दारीमुळे शिवसेनेचा पराभव झाला होता, पण आता ती चूक पुन्हा होणार नाही.

त्यामुळे भाजपने (Bjp) कितीही जोर लावला, आतापासून तयारी केली, तरी या मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा विश्वास (Chandrakant Khaire) खैरेंनी व्यक्त केला. खैरे म्हणाले, लोकसभेच्या तयारीसाठी नड्डांची सभा होणार असल्याची माहिती मला आत्ताच कळाली. हरकत नाही, त्यांना सभा घेवू द्या.

मी तर म्हणतो नड्डाच काय, मोदींनीही सभा घेतली तरी इथली हिंदुत्ववादी जनता उद्धव ठाकरे आणि त्यांच्याच शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही.गेल्यावेळी झालेल्या पराभवामुळे जर कुणाला वाटत असेल की आता पुन्हा इथे शिवसेनेला विजय मिळवता येणार नाही, तर तो त्यांचा भ्रम आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम असलेला आणि कायम भगव्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा असलेला हा बालेकिल्ला आहे. तो आम्ही पून्हा खेचून आणू.

भाजपने कितीही शक्ती लावली तरी खरे हिंदुत्ववादी कोण? आणि ढोंगी कोण? हे जनतेला चांगलेच माहित आहे. त्यामुळे त्यांना किती सभा, बैठका घ्यायच्या त्या घेवू द्या, आम्हाला फरक पडणार नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यावर, शहरावर तुम्हाला पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचाच भगवा फडकलेला दिसेल, असेही खैरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT