Shivsena March For Farmers Demand News, Aurangabad
Shivsena March For Farmers Demand News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या जिल्ह्यात महाआक्रोश मोर्चा..

सरकारनामा ब्युरो

Vidharbh News : अतिवृष्टी, संततधार आदींमुळे त्रस्त शेतकरी मदतीकडे आस लावून बसला असताना पीकविम्याची तुटपुंजी रक्कम देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर केला. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी वीज जोडणी, पीक विमा आदी मागण्यांना शासन दरबारी वाचा फोडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

आझाद मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यात २ हजार (Farmers)शेतकरी शिवसेना (Shivsena) पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चाला संबोधित करताना दानवे यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांची माहिती जनतेसमोर मांडली. यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण अधिक असून ही बाब लाजिरवाणी आहे. झोपलेले हे सरकार यावर कोणतेही ठोस पाऊले उचलतांना दिसत नाही.

सरकारची कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळत नसून त्यांच्या हक्काचा विमा देखील हे सरकार कंपन्यांना देऊ देत नाही. शेतकऱ्यांच अख्खं पीक वाया गेलं तरी त्यांच्या पदरात ५० आणि १०० रुपये विमा देऊन हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. २०१७ साली झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या १ लाख २८ हजार शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्यात यावी.

कापूस,आणि सोयाबीन आदी पिकांना योग्य हमीभाव मिळावा, नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान त्वरित मिळावे. २०१८ पासून बंद असलेली कृषी वीज जोडणी योजना त्वरित चालू करावी. विहिरी दुरुस्तीसाठी खचलेल्या, बुजलेल्या विहिरीसाठी अनुदान मिळावे, अशी मागणी दानवे यांनी केली. सरकार एकीकडे मोठ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा डाव आखत आहे.

दुसरीकडे शेतकऱ्यांची वीज जोडणी कापली जात आहे. वीज जोडणी कापल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवला जाईल, असा विश्वास देखील त्यांनी उपस्थितांना दिला. जिल्हाधिकारी यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले असता, कापूस केंद्र लवकरात लवकर सुरु करण्यात येतील व इतर समस्यांबाबत माहिती घेऊन पावले उचलली जातील असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT