Sanjay Shirsat Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News: आता बोला! सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाच चोरट्यांचा दणका; पाच लाख किंमतीची...

MLA Sanjay Shirsat’s Tractor was Stolen : चोरी करणाऱ्याला पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान..

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत विरोधकांकडून सातत्यानं सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात येत असतो. तसेच गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरत असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, याचवेळी आता सत्ताधाऱ्यांची झोप उडेल अशी एक घटना समोर आली आहे.

राज्यातील सत्तापरिवर्तनापासून कायमच चर्चेत राहणारे आणि ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींच्या टीकेला तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर देणारे शिवसेना(शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांच्या घरीच चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा परिसरातील गट क्रमांक 92 मधून शिरसाट यांच्या मुलीच्या नावावर असलेली ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेली आहे. सत्ताधारी पक्षाचाच आमदाराचा ट्रॅक्टर चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाठ (वय 32 वर्ष, रा. बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर) यांच्या तक्रारीवरून शहरातील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार,सातारा परिसरातील गट क्रमांक 92 मधील तंत्रनगर येथे त्यांच्या बहिणीच्या नावे असलेला आणि पाच लाख रुपये किमतीचा महिंद्रा ट्रॅक्टर (क्रमांक Mh-20-Fu-8926)3 एप्रिलला रात्रीच्या सुमारास चोरीला गेला आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांत गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar) शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत सतत चोरीच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांकडून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र गुन्हेगारी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. पण आता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा शिरसाट याच ट्रॅक्टर चोरीला गेल्यानं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यालाच चोरट्यांनी दणका दिला आहे. आमदार शिरसाटांच्या ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्याला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT