Mla Ambadas Danve-Mp Imtiaz Jalil
Mla Ambadas Danve-Mp Imtiaz Jalil Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : मुस्लिम मतं काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडे जाऊ नये, म्हणून एमआयएमचा मोर्चा..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : येणाऱ्या काळात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका आहेत. या निवडणुकीत मुस्लिमांची मते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसकडे जाऊ शकतात आणि म्हणून एमआयएमने औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतराला विरोध दर्शवत मोर्चाचे नियोजन केले आहे. या मोर्चा कोणाताही परिणाम नागरिकांवर होणार नाही, किंवा शहारतील कायदा व सुव्यवस्थेला देखील गालबोट लागण्याची सुतराम शक्यता नाही. त्यासाठी पोलिस सक्षम आहे, असे म्हणत शिवसेनेला (Shivsena) या मोर्चाकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतला होता. (Imtiaz Jalil) या निर्णयाच्या विरोधात एमआयएम व इतर काही संघटनांच्या वतीने आज शहरातील भडकलगेट ते आमखास मैदानापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला.

या संदर्भात प्रतिक्रिया देतांना अंबादास दानवे म्हणाले, औरंगाबादच्या नामांतराला एमआयएम पाठिंबा देईल अशी अपेक्षा कोणीही करू शकत नाही. कारण त्यांची विचारसरणी ही औरंगजेबाच्या वृत्तीची आहे. तर आम्ही छत्रपती संभाजी महारांजाना माणणारे आहोत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी येथील जनतेचा स्वाभीमान जागा केला आणि या शहराला संभाजीनगर हे नाव दिले. ते येथील जनतेने स्वीकारले आहे.

आम्ही देखील वारंवार खान पाहिजे का बाण पाहिजे, अशी हाक जनतेला दिली होती, त्यातून देखील या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. त्यामुळे जनमत हे औरंगाबाद नाही तर संभाजीनगरच्याच बाजूने असल्याचे सिद्ध झाले आहे. तेव्हा नव्याने त्यासाठी गुप्त मतदान घेण्याची गरज नाही. इम्तियाज जलील हे काही राष्ट्रपती किंवा देशाचे पंतप्रधान नाहीत, की त्यांनी मागणी करावी आणि यावर मतदान घ्यावे.

मुस्लिम मंताचे धुवीकरण डोळ्यासमोर ठेवून काढलेल्या या मोर्चा आम्ही महत्व देत नाही. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लिमांची मते काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडे जाऊ नये यासाठी केलेला हा सगळा खटाटोप असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला होता, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT