Shinde-Thackeray Group News, Aurangabad
Shinde-Thackeray Group News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : शिंदे-ठाकरे गटात लागली स्पर्धा ; पश्चिममध्ये रामकथा विरुद्ध हळदी कुंकू..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे आणि ठाकरे गटात एकमेकांवर कुरघोडी करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. शिंदेंच्या बंडाला (Aurangabad)औरंगाबाद जिल्ह्यातून मोठे पाठबळ मिळाले होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जे पक्षातून फुटून बाहेर गेले त्या आमदार, मंत्र्यांच्या विरोधात ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे.

त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात जावून मेळावे, सभा, शिवसंवाद, महाप्रबोधन यात्रा काढत विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Shivsena) त्याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या पश्चिम मतदारसंघातील महत्वाच्या आणि शहरालगतच्या बजानगर भागात सध्या या दोन्ही गटांकडून कुरघोडीचे प्रयत्न सुरू आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित्त उद्धवसेनेकडून बजाजनगरात भव्य अशा रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांच्या कथेचे आयोजन १९ ते २५ जानेवारी दरम्यान सुरू आहे. या कथेला स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ठाकरे गटाकडून या रामकथेच्या निमंत्रण पत्रिका घरोघरी वाटण्यात आल्या होत्या.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी पदयात्रा काढत ही मोहीम राबवली होती. परिणामी रामकथेला हजारोंची गर्दी जमत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून संजय शिरसाट यांच्याकडून देखील बजाजनगर भागात विविध उपक्रम घेतले जात आहे. नुकतीच मकरसंक्रांत होवून गेली.

या निमित्ताने महिलांना एकत्रित करून हळंदी कुंकवाचे कार्यक्रम आणि त्याला महिलांची होणारी गर्दी यातून शिंदे-ठाकरे गट एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. या दोघांच्या राजकारणात सामान्यांना मात्र रामकथेचा लाभ आणि हळंदी कुंकवाच्या निमित्ताने वाणाच्या रुपात भेटवस्तू मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT