Shinde-Thackeray Group Politics News, Aurangabad
Shinde-Thackeray Group Politics News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : शिंदे गटाकडून `बाप जैसा बेटा, भरलो जल्दी लोटा`, म्हणत खैरे पिता-पुत्रावर टीका..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव आणि आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेचे जिल्हाधिकारी ऋषीकेश खैरे (Rushikesh Khaire) यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लीपवरून शिंदे गटांने निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी फेसुबक पोस्ट करत खैरे पिता-पुत्रांवर टीका केली आहे.

जंजाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एखाद्या कार्यकर्त्यांने जर चार चाकी वाहन घेतले किंवा चांगले मोठे घर घेतले तर त्याच्याकडे संशयाने पाहणारे (Chandrakant Khaire) चंद्रकांत खैरे आता यावर काय उत्तर देतील? यावरून एक गोष्ट लक्षात आली जे आडात आहे तेच पोहऱ्यात आले. (Shivsena) युवा सैनिक घडवण्याची जबाबदारी असणारा पदाधिकारी खऱ्या अर्थाने युवकांना काय आदर्श देणार हा एक चर्चेचा विषय ठरतो, असे म्हणज जंजाळ यांनी टोला लगावला आहे.

शिवाय शिंदे गटाच्या युवासेनेच्या जिल्हाध्यक्षाने देखील ऋषीकेश खैरे यांनी आणखी किती जणांकडून असे पैसे उकळले याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ठाकरे गटाचे मोठे नेते व युवासेनेचा पदाधिकारी असलेला त्यांच्या मुलगा एका व्हायरल कथित ऑडिओ क्लीपमुळे अडचणीत आले आहेत.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋषीकेश खैरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदली करून देतो म्हणून एका व्यक्तीकडून दोन लाख रुपये घेतल्याचा उलगडा या ऑडिओ क्लीपमधून होत आहे. बदली न केल्यामुळे माझे पैसे परत करा, असा तगादा संबंधित व्यक्ती करत असल्याचे यातून स्पष्ट होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना एका अधिकाऱ्याची वन विभागात बदली करून देण्यासाठी ऋषीकेश खैरे यांनी २ लाख रुपये घेतल्याचा उल्लेख या ऑडिओमध्ये आहे. या ऑडिओमुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या ऑडिओमध्ये सदरील व्यक्ती ऋषीकेश यांच्याकडे दोन वर्ष झाली बदलीचे कामही झाले नाही आणि माझे पैसेही परत मिळाले नाही असे सांगत आहे. नेमकं यावरूनच आता शिंदे गटाने खैरे पित्रा-पुत्रावर टीकेची झोड उठवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT