Mla Udaysingh Rajput News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : लग्नासाठी मुलगी मिळत नाही, तुमच्या सर्कलमध्ये पहा ना ; आमदार राजपूतांना तरुणाचा फोन..

Mla Udaysingh Rajput : तुमचा बायोडाटा माझ्याकडे पाठवा निश्चित मी तुमच्यासाठी मुलगी शोधण्याचा प्रयत्न करतो.

Jagdish Pansare

Aurangabad : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नुकतेच तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे विधान केले होते. त्याची प्रचिती आज (Aurangabad)औरंगाबाद जिल्ह्यात आली. खुल्ताबाद तालुक्यातील एका तरूणाने लग्नासाठी मुलगी मिळत नाही, तुमच्या सर्कलमध्ये पहा ना, म्हणत कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांना फोन केला. या दोघांमधील संभाषणाचा आॅडिओ सध्या व्हायरल होत आहे.

यावर (Udaysingh Rajput)आमदारांनी देखील त्या तरुणाला नाराज न करता तुमचा बायोडाटा पाठवून द्या, बघतो म्हणत आश्वासन दिले. सध्या शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत, हा सामाजिक प्रश्न गंभीर बनला आहे. तर अनेकांची लग्नासाठी मुलगी पाहून देतो म्हणून फसवणूक होते याची देखील शेकडो उदाहरणे समोर येत आहेत. (Marathwada) शरद पवारांनी नुकतेच या गंभीर विषयावर भाष्य करत तरुणांची लग्न होत नसल्याचा मुद्दा उपस्थितीत केला होता.

त्यानंतर कन्नड-सोयगावचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांना एका तरुणाने फोन करत चक्क लग्नासाठी मुलगी शोधून देण्याची गळ घातली. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, खासदारांना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण अशा प्रकारची कामे करून द्या म्हणून फोन करणे अपेक्षित आहे. मात्र या तरुणाने चक्क लग्नासाठी तुमच्या सर्कलमधील एखादी मुलगी शोधा, अशी गळ घातली आहे.

आमदार राजपूत आणि या तरुणामध्ये झालेल्या संवादाचा आॅडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उदयसिंह राजपूत यांना फोन करून हा तरुण म्हणाला, साहेब माझी परिस्थिती काही फार बिकट नाही, भद्रा मारोतीच्या खुल्ताबाद तालुक्यात ८-९ एकर शेती आहे. पण लग्नासाठी कोणी मुलगीच देत नाही. साहेब तुम्ही काही तरी करा, तुमच्या सर्कलमध्ये खूप मुली आहेत. यावर राजपूत यांनी तुम्ही तुमचा बायोडाटा माझ्याकडे पाठवा निश्चित मी तुमच्यासाठी मुलगी शोधण्याचा प्रयत्न करतो, असे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT