Shivsena Leader Chandrakant Khaire With Uddhav Thackeray News
Shivsena Leader Chandrakant Khaire With Uddhav Thackeray News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : खैरे गुरुंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर ; ठाकरे, राऊत, देसाईंनाही दिल्या शुभेच्छा..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पक्षनिष्ठा आणि गुरु निष्ठा सर्वश्रुत आहे. प्रत्येक गुरुपौर्णिमेला खैरे मुंबईत मातोश्रीवर जातात. पुर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते गुरू पौर्णिमेला पूजन करत, तर आता त्यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना न चुकता भेटून ते गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतात. तत्पुर्वी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळासमोर देखील ते नतमस्तक होतात.

खैरे यांचा हा दरवर्षीचा शिरस्ता कायम आहे, त्यात कधीही खंड पडत नाही. धार्मिक वृत्तीचे (Chandrakant Khaire) खैरे आपल्या देवावरील श्रद्धेसाठी ओळखले जातात. वेरूळचा घृष्णेश्वर, खुल्ताबादचा भद्रा मारोती, राजूरचा गणपती आणि शहरातील संस्थान गणपती, सुपारी मारोती हे खैरेंचे दैवत. (Shivsena) न चुकता ते या ठिकाणी दर्शनाला जातात.

सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या, शिवसेनेत उभी फूट पडली. कालपर्यंत सोबत असणारे आज विरोधी गटात सामील झाले. तरी पक्षाशी एकनिष्ठ राहून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा ठाम निर्धार करत खैरे पक्षातच आहेत. एवढेच नाही तर ज्या मराठवाड्याची संघटनात्मक जबाबदारी खैरे यांच्याकडे आहे, त्या भागात शिवसेनेला मोठे नुकसान होणार नाही याची काळजी देखील घेतांना ते दिसत आहेत.

अशा संकटाच्या काळातील गुरुपैौर्णिमेचा दिवस विसरतील ते खैरे कसले. आजच्या पवित्र दिवशी खैरे यांनी मुंबईत धाव घेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले आणि आपल्या राजकीय गुरूंपुढे नतमस्तक झाले.

त्यानंतर मातोश्री गाठत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनाही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई यांचीही भेट घेत खैरेंनी त्यांनाही गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत ऍड. आशुतोष डंख, सुनील बागवे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT