Aditya Thackeray News, Aurangabad
Aditya Thackeray News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aditya Thackeray : माझे आजोबाही म्हणत असतील, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्राचे अनावरण..

सरकारनामा ब्युरो

Shivsena : हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या (ता.२३) रोजी जयंती आहे. या निमित्ताने विधीमंडळात लावण्यात येणाऱ्या त्यांच्या तैलचित्राच्या अनावरणावरून सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर बाळासाहेबांच्याच पुत्राचे म्हणजे उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) नाव नसल्यामुळे आधीच वाद सुरू आहे.

त्यात आता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा घटनाबाह्य असा उल्लेख करत त्यांना खोचक टोला लगावला आहे. (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे म्हणाले, माझे आजोबाही विचार करतील की माझे तैलचित्र घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचं अनावरण होत आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे राज्य मागे गेले आहे. राज्य ओके नाही पण हे ओके होऊन बसले आहेत. जेवढे ते खालच्या पातळीवर जातील तेवढे आपण मोठ्या उंचीवर जाणार आहोत. उद्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रांचे अनावरण विधिमंडळात केलं जाणार आहे.

मात्र या गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचे अनावरण झाले असे माझे आजोबा म्हणतील, असा पुनरुच्चार देखील आदित्य ठाकरे यांनी केला. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या आजोबांच्या तैलचित्रांचं अनावरण होणार असल्याचे म्हणत त्यांनी या कार्यक्रमावरच आक्षेप घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT