opposition Leader Ambadas Danve-Chandrakant Khiare Newa Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : आम्ही दोघे मिळून गद्दारांना गारद करू; दानवेंनी घेतले खैरेंचे आशिर्वाद..

चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबुत करण्यासाठी आम्ही जोमाने कामाला सुरूवात केली असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. (Chandrakant Khaire)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एकाच पक्षात असले तरी एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि नुकतेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झालेले अंबादास दानवे यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळतयं. (Shivsena) विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी खैरे यांच्या घरी जाऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.

माझी निवड झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या आदेशाने मी पहिला फोन खैरे यांनाच केला होता, आम्ही दोघे मिळून आता जिल्हाच नाही तर (Marathwada) मराठवाड्यात शिवसेना अधिक मजबुत करू, असा विश्वास व्यक्त करत दानवे-खैरे यांनी एकमेकांना पेढे भरवले. खैरेंनी देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकदा आदेश आला की तो मी मानतोच, शेवटी अंबादास माझा शिष्य आहे, तो ही जबाबदारी चांगल्यारितीने पेलेल. आम्ही दोघे मिळून गद्दारांना गारद करू, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.

अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची दोन दिवसांपुर्वी भेट घेतली होती. बागडेंनी दानवेंना पेढा भरवल्याचे फोटो सोशल मिडियावर झळकल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज दानवेंनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या घरी जाऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.

शिवसेनेतील दोघांच्या समर्थकांना सुखावणारे हे चित्र होते. शिवसेनेच्या जिल्ह्यातील राजकारणात दोन धुव्रांवरची टोकं म्हणून खैरे-दानवे यांचा उल्लेख नेहमीच केला जातो. विरोधी पक्षनेता झाल्यानंतर दानवे यांचे जिल्ह्यात व शहरात जल्लोषात स्वागत झाले, पण त्यात खैरे किंवा त्यांचे समर्थक दिसले नव्हते. यावरून देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर आज खैरे यांची भेट घेत दानवेंनी या सगळ्या चर्चांना पुर्णविराम लावला.

चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबुत करण्यासाठी आम्ही जोमाने कामाला सुरूवात केली असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. तर जिल्ह्यात पाच आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षासमोर उभे राहिलेले आव्हान अंबादास दानवे पेलू शकतील का? यावर दानवे माझेच शिष्य आहेत, त्यांना मिळालेली जबाबदारी ते निश्चित पार पाडतील. माझे त्यांना आशिर्वादच राहतली, आम्ही दोघे मिळून आता गद्दारांना साफ करू, असेही खैरै यांनी स्पष्ट केले.

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. त्यातूनत त्यांनी काल रात्री एक ट्विट केले आणि ते आज डिलिट केले. यावर दानवे आणि खैरे या दोघांनीही ते रात्रीचे ट्विट होते, त्याबद्दल काय बोलावे असा टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT