Uddhav Thackeray News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena (UBT) : ठाण्यातील ठाकरेंच्या मेळाव्यानंतर शिंदे गट बिथरला का ?

Maharashtra : शिरसाट हे अगदी बंडाच्या सुरुवातीपासून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आघाडीवर राहिले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra : शिवसेनेतील फुटीला कारणीभूत ठरलेल्या एकनाथ शिंदे- श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांच्या ठाण्यात जाऊन काल उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषी कार्यकर्ता मेळावा घेतला. (Shivsena - UBT News) खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने झालेल्या या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांची भाषणे देखील आक्रमक झाली. राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना खास या मेळाव्यासाठी ठाण्यात पाचारण करण्यात आले होते.

या मेळाव्यातून ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे या मेळाव्यात झालेली भाषणं, आरोप-प्रत्यारोपानंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. (Uddhav Thackeray) ठाकरे गटावर तुटून पडण्याची जबादारी शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांच्यावर सोपवण्यात आली. शिरसाट यांनी ज्या पद्धतीने माध्यमांशी बोलतांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना उद्देशून टीका केली, ती पाहता ठाकरेंच्या मेळाव्यानंतर शिंदे गट बिथरल्याची चर्चा रंगू लागली आहे.

आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाकरेंच्या कुटुंबातील कुणी का आले नाही? हे सांगताना (Sanjay Shirsat) शिरसाट यांनी केलेले आरोप अतिरंजित वाटतात. प्रियंका चतुर्वेदी यांना लक्ष्य करतांना त्यांच्या सौदर्यामुळे त्यांना आदित्य ठाकरेंनी खासदारकी दिली हा चंद्रकांत खैरे यांचे नाव घेऊन केलेल्या आरोपामुळे देखील सर्वसामान्यांमधून उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. शिरसाट यांच्या आरोपानंतर त्याला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्याची स्पर्धा लागली आहे.

आदित्य ठाकरे, संजय राऊत, किशोरी पेडणेकर, विनायक राऊत आदींनी शिरसाट यांच्या आरोपांवर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी शिरसाट यांना त्यांची लायकी कळाली, मंत्रीपद न मिळाल्याच्या निराशेतून ते अशी वक्तव्य करत असल्याची संयमीत प्रतिक्रिया दिली. शिरसाट यांनी ठाकरे गटाविरुद्ध घेतलेल्या आक्रमक भूमिका आणि टीकेनंतर पुन्हा याचा संबंध त्यांना न मिळालेल्या मंत्रीपदाशी जोडला जात आहे. शिरसाट हे अगदी बंडाच्या सुरुवातीपासून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आघाडीवर राहिले आहे. ठाण्यातील हिंदी भाषिकांच्या मेळाव्यानंतर शिंदे यांनी शिरसाटाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्याची चर्चा देखील या निमित्ताने होत आहे.

आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दलच्या संशयाचे भूत पुन्हा वर काढून उद्धव ठाकरे यांना खिंडीत गाठण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा कित्येक वर्षापासूनचा बालेकिल्ला आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे या पिता-पुत्रांप्रमाणेच शिंदे पिता-पुत्रासाठी देखील या जिल्ह्यावरील वर्चस्वाल मोठे महत्व आहे. त्यामुळे ठाकरेंनी थेट ठाण्यात येऊन हिंदी भाषिकांचा मेळावा घेतल्याने एकनाथ शिंदे यांनी त्याला गांभीर्याने घेतले असावे. ठाकरे गटाला कोणत्याही परिस्थितीत ठाण्यात सहानुभूती मिळू नये, यासाठी आनंद दिघे यांच्या मृत्यूचा विषय पुढे केला जात असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT